विसरलास तू मानव पुत्रा,
नीतिमूल्ये सगळी,
काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली….।। धृ ।।
स्वप्नामध्ये दिले वचन,
पाळीले ते राज्य घालवून,
हरिश्चद्रांची कथा आजही
करीते मान ताठ आपुली….१,
विसरला तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
राजा साठी देई प्राण,
दुजासाठी होते जीवन,
‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी
शिवरायाची शान राखली….२,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
काळ असो तो पुरातन,
वा आधुनिक शिवकालीन,
पूर्वज सारे महान असता,
आज पुण्याई अशी का आटली?….३,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
विश्वासाचे नाते गेले,
स्वार्थीपणाचे बीज अंकुरले,
लुटतो मानव एकमेका,
हीच चित्रे आज उमटली…..४,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply