नवीन लेखन...

निवडक बॅंकिंग निवाडे

Nivdak Banking Niwade`शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ असे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. तरी आपल्यापैकी अनेकांना काही ना काही कारणाने कोर्टाची पायरी चढावीच लागते. निरनिराळे बॅंकिंग व्यवहार वाढ्‌ल्यापासून तर हे प्रमाण फारच वाढले आहेत.

एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी आपण जमानतदार राहिलो आणि त्याने कर्जाची परतफेड ठरल्याप्रमाणे केली नाही, एखाद्याने आपल्याला दिलेला धनादेश वटला नाही, आपण एखाद्याला दिलेला धनादेश वटला नाही, बॅंकेने आपण घेतलेल्या कर्जावर निर्धारित दरापेक्षा जास्त व्याज आकारले, आपण संचालक असलेल्या कंपनीचे धनादेश अनादरित झालेत, अशा एक ना अनेक कारणांसाठी आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते आणि कायद्याच्या तरदुदी तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात, सर्वसामान्य ग्राहकांना त्या दृष्टिने मदत व्हावी, या हेतूने नागपूरच्या सुप्रसिद्ध “नचिकेत प्रकाशन” या संस्थेने निवडक बॅंकिंग निवाडे हे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे.

कायद्याची, सर्वोच्च न्यायालयाच्या आणि निरनिराळ्या उच्च न्यायालयांच्या निवाड्यांची माहिती देणारी बहुतांश पुस्तके इंग्रजीत असतात. आपण सुशिक्षितपणाचा कितीही आव आणला आणि दोन-चार वाक्ये इंग्रजीत बोलता आलीत म्हणजे आपल्या इतके इंग्रजी भाषेवर कोणाचेच प्रभुत्व नाही असे जरी आपल्याला वाटत असेल तरी कायद्याची भाषा समजून घेणे फार अवघड आहे.

बॅंका आणि पतसंस्था तसेच इतर वित्तीय संस्था यांचे सर्वसामान्य ग्राहक, कर्मचारी, ऑडिटर, सी.ए. यांना महत्वपूर्ण बॅंकिंग निवाड्यांची माहिती आपल्या मराठी भाषेतून व्हावी, या उद्देशाने नचिकेत प्रकाशनाने हा उपक्रम सुरू केला आहे. बॅंकिंग व्यवहाराशी संबंधित एकूण 226 निवाड्यांचे सार या पुस्तकात देण्यात आले आहे.सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचा थोडक्यात निकाल, कायद्याच्या कलमांचा उल्लेख, निवाडा कोणत्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेला आहे, त्याचा संदर्भ क्रमांक, अशा प्रकारे पुस्तकात मांडणी केली आहे.बॅंकेच्या व्यवहारासंबंधीचे निवाडे, धनादेश अनादराशी संबंधित निवाडे, डी.आर.टी. आणि नवीन सिकुरिटायझेशन ऍक्टबाबतीतले निवाडे, कर्ज व्यवहारासंबंधीचे निवाडे, इ. अनेक महत्वपूर्ण निवाडे या पुस्तकात देण्यात आले आहेत.

बॅंकेशी किंवा वित्तीय संस्थांशी संबंध येणार नाही असा सुशिक्षित माणूस आता शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाचे बॅंकेत किंवा वित्तीय संस्थेत काही ना काही व्यवहार असतातच. अशावेळी दैनंदिन व्यवहारात किंवा पुढे प्रकरण कोर्टात पोहचल्यास निदान प्राथमिक माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. निवडक बॅंकिंग निवाडे हे पुस्तक आपली ती गरज पूर्ण करते.

श्री अनिल सांबरे यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून किंमत 350 रुपये आहे. निरनिराळ्या महत्वपूर्ण निवाड्यांना एकत्र करून त्यांचे सार मराठीतून प्रकाशित करणे हे खूपच मेहनतीचे आणि धाडसाचे काम आहे म्हणूनच किंमत थोडी जास्त वाटत असली तरी ती सार्थ आहे. पुस्तकात अक्षर जुळवणीत थोड्या फार चुका आढळतात परंतु त्यामुळे अर्थाचा अनर्थ होत नसल्यामुळे विशेष फरक पडत नाही, पुढील प्रकाशनात या चुका पुन्हा होऊ नयेत याची खबरदारी प्रकाशक घेतीलच. सर्वसामान्य मराठी ग्राहकांना बॅंकिंग निवाड्यांची माहिती करून देण्याचे जे धाडस नचिकेत प्रकाशनाने केले आहे त्याबद्दल निश्चितच अभिनंदन करावेसे वाटते. हा उपक्रम असाच चालू ठेवून इतरही कायद्यांशी संबंधित निवाडे मराठीतून आपल्याला नचिकेत प्रकाशनाच्या माध्यमातून वाचायला मिळतील, अशी आशा आहे.

निवडक बॅंकिंग निवाडे
प्रथम आवृत्ती: एप्रिल २००७
संपादक : अनिल सांबरे
किंमत : 350 रु.
प्रकाशक: नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर, 440015
फोन : 6536653, 6535167, मो. 9225210130

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..