स्मिता गवाणकर यांचा जन्म २४ एप्रिलला रायपूर मध्यप्रदेश येथे झाला.
स्मिता गवाणकर यांचे वडील उद्योग धंद्यासाठी सांगली येथे स्थायिक झाल्याने त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सांगली येथेच झाले. शाळेत असल्यापासून त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून भाग घेतला.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सांगली आकाशवाणी येथे आवाजाची चाचणी दिली आणि निवेदिका हा त्यांचा प्रवास सुरु झाला. सुरवातीला त्यांना फक्त आकाशवाणीची उद्घोषणा, रूपरेषा इतकंच काम असायचं. पण नंतर स्मिता गवाणकर यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली व त्यामुळे निवेदन या कलेची छान ओळख झाली. त्याच दरम्यान स्मिता गवाणकर यांनी मुंबई दूरदर्शन मध्ये रीतसर परीक्षा देऊन नोकरीला सुरुवात केली.
मुंबई दूरदर्शन मध्ये अनेक कार्यक्रम केल्यानंतर त्यांनी ‘हॅलो सखी’ हा कार्यक्रम सलग सात वर्ष केला. यात तनुजा शशिकला, श्रीनिवास खळे, प्रभाकर पणशीकर, अशोक पत्की यांना मुलाखतीच्या माध्यमातून स्मिता गवाणकर यांनी प्रथमच बोलते केले.
२००९ ला साम टीव्ही मराठी या वाहिनीवर ‘मधुरा’ हा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. ब्रेक घेताना म्हटलेली अलंकारिक वाक्यं स्मिता गवाणकर हे त्यांची खासियत ठरली. त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगळी ओळख मिळाली. ‘मधुरा’ या कार्यक्रमात रोज नव्या सेलीब्रेटीची गाठ घालून देत असत. श्रेया घोषाल जॅकी श्रॉफ, गुडडी मारुती, ज्युनिअर मेहमूद, मेहुल कुमार, सुदेश भोंसले या सारखे मान्यवर या कार्यक्रमात आले. रविवार वगळता सलग तीन वर्ष हा कार्यक्रम रोज प्रसारित होत असे.या कार्यक्रमाचे ११०० भाग प्रसारित झाले हा एक विक्रमच होता. याशिवाय अनेक संकल्पना असलेले रंगमंचावर चे कार्यक्रमा चे निवेदन करण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply