१) विचारले तर सांगा सांगितले तर विचारु नका.
२) बाहेर जातांना कुठे म्हणून विचारु नका. सांगितलेच तर कधी येणार हे विचारु नका.
३) दिले तर मुकाट्याने खा. न दिले तर मागू नका.
४) दाखवले तर छानच आहे म्हणा छान असलेले दाखवा म्हणू नका.
५) ऐकू आले तरीही कानाडोळा करा आणि कानाडोळा केलेले परत ऐकू नका
६) नात्यात व्यवहार करु नका आणि केलाच व्यवहार त्यात व्यापार करु नका
७) आवडनिवड जोपासू नका जोपासली तर मोठेपणा देऊ नका
८) आपला काळ विसरून जा त्यांचा काळ बघत रहा
9)कुणालाही उपदेश करु नका केलाच तर अपेक्षा ठेवू नका.
10)काटकसर बचत या गोष्टी सांगू नका सांगितल्याच तर वादविवाद वाढवू नका
11) घरात अलिप्त राहू नका.मदत केली तर उपकाराची भाषा बोलू नका.
12) देव दान धर्म या बद्दल कामे सांगू नका जे करतात त्याला नावे ठेवू नका.
13) दुसर्यांची उदाहरणे देऊ नका दिलीच तर तुलना करु नका.
14) आजाराचे रडगाणे गाऊ नका स्वतःची काळजी इतरांवर सोपवू नका
15) नेहमी कशात तरी गुंतून रहा. आपले जीवन आपल्या साठी जगत रहा.
-सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply