(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)
एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी
नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी…१,
मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते
गादीवरती पडून सारे, स्वप्ने आपली रंगवीत होते,
तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी
हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी,
कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने
शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने,
भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते
कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप ते काय असते
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply