मोबाइलमध्ये फ्रंट कॅमेरा ऑन करून मोबाइलच्या फ्रेममध्ये आपण स्वत:ला पाहायला लागलोय, ज्याला आपण ‘सेल्फी’ म्हणतो. तर हा सेल्फी म्हणजे आपण स्वत:मध्ये डोकावून बघण्याचं माध्यम आहे. स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण/ठिकाण आपल्यासकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात तर ‘सेल्फी’ खूप काढण्याची हौस दिसून येते.
सेल्फी काढण्याची सवय हा एक आजारच आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे, या आजाराला सेल्फिटीस संबोधले जाते. याबाबतचा अभ्यास भारतात करण्यात आला आहे.
नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठ व तामिळनाडूची त्यागराजर स्कूल मॅनेजमेंट या संस्थांनी २०१४ मध्ये सेल्फिटिसची चर्चा सुरू झाल्यानंतर याबाबत संशोधन सुरू केले. सेल्फिटिस हा मानसिक रोग असल्याचे वर्गीकरण पहिल्यांदा अमेरिकन सायकिॲकट्रिक असोसिएशनने केले होते. आता सेल्फिटिस वर्तन हा रोग असल्याचे ठोसपणे सांगण्यात आले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply