नवीन लेखन...

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी

कैलाश सत्यार्थी यांचा जन्म ११ जानेवारी १९५४ रोजी मध्यप्रदेशमध्ये विदिशा येथे झाला.

कैलाश सत्यार्थी यांचे शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पर्यंतचे. इंजिनीअरिंग पदवीला चांगलेच वलय असण्याचा तो काळ. ठरवले असते तर सत्यार्थी छानपैकी करिअर करू शकले असते त्यातच. पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग होता बाह्य आक्रमणांमुळे कोमेजू पाहणारे लहानग्यांचे बाल्य वाचवण्याचा… ‘बचपन बचाव आंदोलन’चा.

आज कैलाश सत्यार्थी यांची ‘बचपन बचाव आंदोलना’ ही बालमजुरी, शोषण आणि लहान मुलांचे हस्तांतरण या विरोधात कार्य करणारी देशातील अग्रणी संस्था आहे. ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट लेबर’ या संस्थेसाठीही ते काम करतात, तर ‘आंतरराष्ट्रीय बालमजूर व शिक्षण केंद्र’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मंडळावरही सत्यार्थी यांचा समावेश आहे. तसेच ‘रगमार्क’ या संस्थेची सत्यार्थी यांनी स्थापना केली आहे. या संस्थेने युरोप आणि अमेरिकेत १९८०च्या दशकाच्या अखेरीस आणि १९९० च्या दशकाच्या प्रारंभास ग्राहक आणि व्यापारविषयक उत्तरदायीत्व जागृत करण्यासाठी काम केले. बालमजुरी हा मानवी हक्कविषयक मुद्दा असून, कल्याणकारी आणि दातृत्वाचाही त्यात समावेश होतो, असे सत्यार्थी सांगतात.

बालमजुरीमुळे दारिद्र्य, निरक्षरता, लोकसंख्येत वाढ आणि अन्य सामाजिक प्रश्न कायम राहातात, असे ते म्हणतात. त्यांच्या या ‌निष्कर्षांना त्यांच्या अनुभवांची आणि संशोधनांची जोड आहे. ‘सर्वांसाठी शिक्षण’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बालमजुरीविरोधातील चळवळ महत्त्वपूर्ण असल्याचे ते स्पष्ट करतात. युनेस्कोच्या शिक्षणासाठी जागतिक भागीदारी या उपक्रमात ते सहभागी झाले होते. अमेरिकेतील बालशोषणाविरोधात काम करणाऱ्या अनेक संस्थांशी ते जोडले गेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘सहस्रक विकास उद्दिष्टां’तर्गत २०१५ पर्यंत बालमजुरी आणि बालगुलामगिरी नष्ट करण्यासाठी स्थापलेल्या मोहिमेत ते सहभागी आहेत.

बालमजुरी आणि लहान मुलांची वाहतूक रोखण्याचे उद्दिष्ट ठेवून; तसेच सर्व मुलांना शिक्षण हे ध्येय ठेवून ‘बचपन बचाव संस्थे’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालकामगारांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने रग उत्पादक कंपन्यांमधील बालमजुरांचा समावेश आहे. सत्यार्थी यांनी राजस्थानात बालआश्रमाची स्थापना केली. या आश्रमात बालमजुरीच्या पाशातून सोडवलेल्या लहान मुलांना प्राथमिक कौशल्ये शिकवली जातात. या आश्रमाची क्षमता १०० मुलांची असल्याने कैलाश सत्यार्थी यांनी ‘बालमित्र ग्राम’ या उपक्रमाची स्थापना केली. या अंतर्गत ग्रामीण भागात बालमजुरीविरोधात जागृती करण्यात येते.

या आंदोलनाला त्यांनी जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. सत्यार्थी यांच्या या महान कामासाठी कैलाश सत्यार्थी यांना २०१४ चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.

सत्यार्थी यांच्यावर अनेक माहितीपट निघाले आहेत. डिफेंडर्स ऑफ डेमॉक्रसी ॲ‍वॉर्ड (२००९, अमेरिका) • अल्फोन्सो कोमिन आंतरराष्ट्रीय पारितोषिक (२००८, स्पेन) • मेडल ऑफ द इटालियन सिनेट (२००७) • फ्रीडम ॲ‍वॉर्ड (२००६, अमेरिका) • वॉलेनबर्ग मेडल (२००२, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जर्मनी व नेदरलँड्स सरकारने ही त्यांचा सन्मान केला आहे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..