नवीन लेखन...

नोबेल पारितोषिकं – २०२३

नोबेल पारितोषिकं – २०२३

सन २०२३ची नोबेल पारितोषिकं नुकतीच जाहीर झाली आहेत. यांतील भौतिकशास्त्रातलं पारितोषिक अणूंतील इलेक्ट्रॉनसंबधीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, प्रकाशस्पंदांच्या निर्मितीसाठी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक नॅनोतंत्रज्ञान ज्यावर आधारलेलं आहे, त्या अतिसूक्ष्मकणांच्या निर्मितीवरील संशोधनासाठी देण्यात येणार आहे. शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे, कोविडच्या साथीच्या काळात, जलद गतीनं मोठ्या प्रमाणावर लसनिर्मिती शक्य केलेल्या, जनुकीय लसनिर्मितीच्या तंत्रज्ञानावरील संशोधनासाठी दिलं जाणार आहे. या तिन्ही नोबेल पारितोषिकांमागच्या संशोधनाचा हा थोडक्यात आढावा…

भौतिकशास्त्रः अत्यल्प अवधीचे प्रकाशस्पंद –
इलेक्ट्रॉनसारख्या अतिसूक्ष्म वस्तूंच्या हालचाली अभ्यासायच्या, तर त्यासाठी १०-१८ सेकंद, इतक्या अत्यल्प कालावधीच्या स्पंदांच्या स्वरूपातल्या प्रकाशाचा वापर करावा लागतो. इतक्या अल्पावधीचे प्रकाशस्पंद निर्माण करणं ही एक आव्हानात्मक बाब होती. मात्र हे शक्य असल्याचं संशोधकांनी दाखवून दिलं. या अत्यल्प कालावधीच्या प्रकाशस्पंदांच्या निर्मितीसंबंधी कळीचं संशोधन केल्याबद्दल, अमेरिकेतील ओहायओ स्टेट युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील पिअर अ‍ॅगोस्तिनी, जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ क्वांटम ऑप्टिक्स या संस्थेतील फेरेंस क्राऊझ आणि स्वीडनमधील लुंद विद्यापीठातील अ‍ॅन ल’हुइलिअर या संशोधकांना या वर्षीचं भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे.

रसायनशास्त्रः नॅनोतंत्रज्ञानाची बिजं –

पदार्थाचे गुणधर्म हे त्यांतील अणूंतील इलेक्ट्रॉनच्या रचनेवर अवलंबून असतात. मात्र या पदार्थाचा आकार अतिसूक्ष्म म्हणजे नॅनो (१०-९ मीटर) पातळीपर्यंत लहान करीत नेला, तर त्या पदार्थाच्या गुणधर्मांत आमुलाग्र बदल घडून आलेले दिसतात. या अतिसूक्ष्म कणांना म्हणजे नॅनोकणांना ‘पुंजीय बिंदू’ (क्वांटम डॉट) म्हटलं जातं. या पुंजीय बिंदूंचा शोध लावणाऱ्या व त्याची नियंत्रित पद्धतीनं निर्मिती करू शकणारं सोपं तंत्र विकसित करणाऱ्या, तीन संशोधकांना या वर्षीचं, रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. अमेरिकेत संशोधन करणारे हे संशोधन आहेत – मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतील माऊंगी बावेंडी, कोलंबिआ विद्यापीठातील लुईस ब्रुस आणि नॅनोक्रिस्टल्स टेक्नॉलॉजी इनकॉर्पोरेटेड या कंपनीतील अलेक्झाय एकिमोव्ह.

शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्रः जनुकीय लसी –

सन २०२०-२१ या दोन वर्षांत, कोविडच्या साथीनं जगभर हाहाकार उडवून दिला होता. कोविडची ही साथ आटोक्यात आणण्यासाठी, संशोधकांडून लसींच्या निर्मितीसाठी अथक प्रयत्न केले गेले आणि विविध लसींची निर्मिती केली गेली. कोविडला नियंत्रणात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारी एक लस ही ‘एमआरएनए लसीं’च्या प्रकारातली लस होती. या एमआरएनए प्रकारातील लसींच्या निर्मितीचा पाया ज्यांच्या संशोधनाद्वारे घातला गेला, ते दोन शास्त्रज्ञ म्हणजे कॅटॅलिन कॅरिको आणि ड्रू वाईसमॅन. अमेरिकेतील पेनसिल्वेनिआ विद्यापीठात संशोधन करणाऱ्या या दोन संशोधकांना या वर्षीचं शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्र या विषयातलं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे.

प्रतिशब्द (भौतिकशास्त्र): अतिनील – ultraviolet; अवरक्त – infrared; अ‍ॅट्टोसेकंद (१०-१८ सेकंद) – attosecond; आयनीभवन – ionisation; आंशिक पट – fraction; निष्क्रिय वायू – inert gas; प्रकाशस्पंद – light pulse; फेम्टोसेकंद (१०-१५ सेकंद) – femtosecond; रॅबिट तंत्र – RABBIT technique; रेणू – molecule; लहरलांबी – wavelength; वर्णपट – spectrum; स्ट्रिकिंग – Streaking technique; स्पंद – pulse

प्रतिशब्द (रसायनशास्त्र): आयन – ion; कॅडमिअम सल्फाइड – cadmium sulphide; कॉपर क्लोराइड – copper chloride; क्वांटम डॉट – quantum dot; द्रावक – solvent; द्रावण – solution; नॅनोतंत्रज्ञान – nanotechnology; नॅनोमीटर (१०-९ सेकंद) – nanometre; पुंजीय बिंदू – quantum dot; पुंजीय भौतिकशास्त्र – quantum physics; संपृक्त – saturated; संयुग – compound; संवेदक – sensor; सैद्धांतिक – theoretical; सौरघट – solar battery

प्रतिशब्द (शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्र): आरएनए – RNA (Ribonucleic acid); एमआरएनए (मेसेंजर आरएनए) – mRNA (messanger RNA); केंद्रक – nucleus; जनुकीय – genetic; जनुकीय रचना – genetic code; जीवाणू – bacteria; झिका – Zika; डेंड्रिटिक – dendritic; पेशी-संवर्धन – cell culture; प्रतिद्रव्य – antibody; प्रतिरक्षण – immunological defense; प्रथिन – protein; मर्स – MERS (MERS-CoV); युरिडिन – uridine; रेणू – molecule; विषाणू – virus; शोथ – inflammation; स्युडोयुरिडिन – pseudouridine

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..