८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटा – बदलिच्या निर्णयाने मोदी सरकार ने धमाका उडवून दिला. कोणी त्याचे समर्थन करो , कोणी विरोध करो ; पण कोणीही दुर्लक्ष करूच शकणार नाही . ” अशाच स्वरूपाचा तो निर्णय आहे . या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे अक्षरशः सर्वांनाच या ना त्या प्रकारे स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचा पुनर्विचार करावा लागत आहे . एक प्रकारे या निर्णयांचा पाठपुरावा हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनत आहे . . . . सरकारच्या समर्थकांसाठी आणि विरोधकांसाठीही .
तेंव्हापासून माझ्या मनात असे येत आहे कि ही कदाचित केवळ सुरुवात आहे. अगदी आर्थिक क्षेत्रापुरता विचार करायचा झाला तर वस्तू आणि सेवाकर ( GST ) ची अंमलबजावणी उशिरात उशीरा ऑगस्ट – सप्टेंबर २०१७ च्या सुमारास होणे, आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्चच्या ऐवजीजानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा होणे , वैयक्तिक आणि संस्थात्मक आयकरात दर आणि करपात्र उत्पनाच्या पातळ्यांमधे बदल होणे , जास्तीतजास्त आर्थिक व्यवहार बन्कान्मार्फतच करण्याची सक्ती होणे , बन्कान्मार्फत होणारे व्यवहार हा काही प्रमाणात तरी कर – रचनेचा पाया होणे आणियावर्षी अर्थसंकल्प जरी १ फेब्रुवारी २०१७ ला सादर होणार असलातरी नंतरच्या काळात तो नोव्हेंबर – डिसेंबर मधेच सादर होणे असे बदल होण्याचीशक्यता जरासुद्धा नाकारता येत नाही .
अर्थातच असे बदल फक्त आर्थिक क्षेत्रातच होतील असे मला आधीही वाटत नव्हते . आणि भारतीय लष्कराच्या सर – सेनापतीची नेमणूक करताना दोनआधिकार्यान्ची वरिष्ठता डावलली गेली हे पाहिल्यावर तर जास्तच तसे वाटू लागले आहे . पण त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहीजे कि त्याच आठवड्यातसर्वोच्च न्यायालयाच्या सर – न्यायाधीशान्ची निवड करताना अशी वरिष्ठता डावलली गेलेली नाही . त्यात संबंधित न्यायाधीशनी काही अवघड निर्णयघेतले असले तरी सुद्धा !
त्यातच या दोन ( सरसेनापती आणि सरन्यायाधीश ) नेमणुका होत असतानाच त्याच काळात भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्ष – पदी खासदारपूनमताई महाजन यांची नेमणूक , निवड होणे हे मोठे सूचक आहे . राजकीय क्षेत्रातही उलथापालथ होणार अशा अर्थाने ही नेमणूक सूचक आहे . महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुनढे यांचे पंख येणाऱ्या काळात छाटले जातील असा तर या नेमणुकीतुन दिला जाणारा संकेततर नाही ना हे बघणे महत्वाचे ठरू शकेल . तसे नंतर करायचे असेल तर मुनढे – महाजन गटाच्या मंडळी कडून होऊ शकणार्या संभाव्य विरोधाची धारकमी करण्यासाठी मदत म्हणून तर ही नेमणूक आधीच केली गेली नाहीये ना हे तर येणारा काळच ठरवेल .
राजकीय क्षेत्रात होऊ शकणारा एक संभाव्य बदल म्हणजे २०१७ – १८ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत संमत झाल्यानंतर केंद्रीय मंत्री -मंडळात होऊ शकणारे बदल . असे बदल होतील असे जर ग्रुहित धरले तर त्यापैकी एक बदल असा असू शकतो कि विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री मा . श्री. अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली . अशी बदली जर झालीच तर जेटली ग्रुह , संरक्षण किंवा परराष्ट्र – व्यवहार यांपैकी कोणत्या खात्याचे तेमंत्री बनतील हे बघणे उदबोधक ठरेल .
कारण अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासातले मंत्री आहेत . २०१४ च्या मोदी लाटेत अम्रुतसर सारख्या लोकसभा मतदार -संघातून निवडणूक हरूनही ते अर्थसारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत . सुरवातीस तर अर्थखात्याबरोबरच संरक्षण खात्यासारख्या दुसऱ्याअतिशय महत्वाच्या खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे होता .
त्यामुळे अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली झालीच तरी ती परराष्ट्र – व्यवहार , संरक्षण किंवा ग्रुह अशा अतिशय मान्यवर आणि महत्वाच्या खात्यातच होण्याची शक्यता आहे . विद्यमान परराष्ट्रमंत्री मा . सुषमाजी स्वराज यांची नुकतीच एक मोठी सर्जरी झाली आहे . त्यामुळ मा . श्री . अरुण जेटली हे जर अशा संभाव्य फेरबदलात परराष्ट्रमंत्री झालेच तर सुषमाजी लोकसभा सभापती होण्याची शक्यता आहे . भाजपाचे ज्येष्ठ नेते मा . श्री .लालकृष्ण अडवाणीजी यानी अलीकडेच संसद न चालल्याबद्दल केलेल्या निषेधाची दखल घेतल्याचा संकेत त्यातून दिला जाऊ शकतो . सुषमाजी तशाही अडवाणी गटाच्या मानकरी असल्याची चर्चा माध्यमात होत असते हे लक्षात घेता तोही भाग असेल . निदान असू शकतो . तसे झाल्यास लोकसभेच्या सध्याच्या सभापती मा . सुमित्राताई महाजन यांचा समावेश एकतर केंद्रीय मंत्रीमंडळात होऊ शकतो ( अटलजीन्च्या मंत्रीमंडळात त्यामंत्री होत्याच . ) किंवा एखाद्या मोठ्या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ति होऊ शकते .
अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री होण्यास एकच अडचण वाटते आणि ती म्हणजे स्वतः पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांचे स्वतचेया खात्यात इतके सातत्यपूर्न लक्ष असते कि जेटली साहेबांसारखा त्यांचा अत्यंत विश्वासू मंत्री ते या खात्यास देतील का ? मात्र खरंच तसेच झाल्यास सध्या एम. जे . अकबर आणि व्ही . के . सिंग असे दोन मातब्बर राज्यमंत्री परराष्ट्र खात्यात आहेत . त्यातल्या अगदीच दोघांचीही या खात्यातून जरीबदली झाली नाही तरी निदान एकाची तरी होईल अशी शक्यता आहे .
जर अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री झाले नाहीत तर दुसरी शक्यता म्हणजे ते केंद्रीय ग्रुहमन्त्रि होतील . मात्र ते उत्तर प्रदेशच्याविधान – सभा निवडणुकात काय निकाल लागतो यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल . उत्तर प्रदेशात भाजपाचे राज्य त्या निवडणुकात आल्यासमा . श्री . राजनाथसिंगजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यास ही शक्यता जास्त आहे .
मा . श्री . अरुण जेटली अशा संभाव्य फेरबदलात जर ग्रुह किंवा परराष्ट्रमंत्री न झाल्यास संरक्षणमंत्री होण्याचीही शक्यता आहे . सध्याचे संरक्षणमंत्री मा. श्री . मनोहर पर्रिकर यांची कार्यक्षमता , निस्प्रुहता , निरलसता , बुद्धीमत्ता या कशाचाच प्रश्ण नाही . पण एका विशिष्ट वयाननन्तर सार्वजनिक पदीन राहण्याचा त्यांचा स्वतचाच स्वयंघोषीत निर्णय आणि काही कालापूर्वीच्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी ” संरक्षण खात्यात स्थिरावलो आहे , पणदिल्लीत नाही ” हे उत्तर यावरून ही शक्यता वाटते .
मा . सुषमाजी स्वराज यांच्या बाबत वाटणारी अजून एक शक्यता म्हणजे विद्यमान राष्ट्रपति मा .श्री . प्रणबकुमार मुखर्जी यांची राष्ट्रपतिपदाचा कार्यकालसंपल्यावर त्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सुषमाजी भाजपाच्या उमेदवार असू शकतात . ज्येष्ठतेच्या निकषांवर मा . श्री . लालकृष्ण अडवाणी हेत्यासाठीचे उमेदवार असायला हवे . पण सद्यस्थितीत ती शक्यता कमी वाटते . याची खात्री पटल्यामुळे तर खासदारकी सोडण्यास असल्याची चिडचिडत्यांच्याकडून व्यक्त झाली असेल का ? मा . श्री . शरद पवार हे राष्ट्रपति पदाचे उमेदवार असण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांना वाटत असली ,मोदीसाहेब अधूनमधून पवार साहेबान्बद्दल कौतुकास्पद उदगार काढत असले , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांनी जरी आत्ताच्यास्थानिक संस्थाच्या निवडणुकात नाव घेऊन टीका केली नसली तरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रपति पदासाठीच्या उमेदवारीला मोदी साहेबांचा भाजपपाठिंबा देण्याची शक्यता आजमितिला तरी फार कमी वाटते . पण भाजपाने पुरस्कृत केले नाही तरी जर पवार साहेब राष्ट्रपति पदासाठी उभे राहिले तरशिवसेना काय भूमिका त्यावेळी घेते हे बघणे महत्वाचे ठरेल . मा . प्रतिभाताई पाटील यांना मराठी महिला या मुद्द्यावर दिलेल्या पाठिंब्याच्या जरपुनरावृत्ति झाली तर त्यावेळी भाजप – शिवसेना यांचे परस्पर – संबध हा विषय त्यावेळी पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतो .
अरुण जेटली साहेब यांची जर अर्थखात्यातून बदली झालीच तर नवीन अर्थमंत्री कोण असेल ? राज्यसभा tv ला त्यांनी नोटाबंदीच्या संदर्भात दिलेल्यामुलाखतीनंतर डॉ . नरेंद्र जाधव यांच्या नावाची त्या पदासाठी काहीजण चर्चा करत आहेत . पण पंतप्रधानांची कार्यपद्धती लक्षात घेता ती शक्यता फारकमी वाटते . मा . श्री . पीयूष गोयल भाजपाचे राष्ट्रीय खजिनदार असूनही , मोदी साहेबांचे जुने निकटवर्ती असूनही पीयूष गोयल एकदम पूर्ण कॅबिनेटमंत्री झाले नव्हते हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल . सध्याचे रेलवे मंत्री सुरेश प्रभू यांची शक्यता तुलनेने जास्त वाटते . पण माझा अंदाज असाआहे कि जर खरोखरच नवीन व्यक्ति केंद्रीय अर्थमंत्री बनन्याची संधी असेलच तर ती व्यक्ति पीयूष गोयल असेल . त्यांची मोदी सरकार मधलीआजपर्यंतची कामगिरी , त्यांची शैक्षणिक पात्रता , नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञला खडे बोल सुनावन्याचे त्यांनी दाखवलेले धाडस या गोष्टीइतकेच याबाबत महत्वाचे ठरू शकेल असा घटक म्हणजे मा . नरेंद्र मोदी यांची त्यांनी गेली अनेक वर्ष केलेली पाठराखण . याबाबत मा . अरुणजेटली आणि पीयूष गोयल यांच्यत असणारे साम्य म्हणजे नरेंद्र मोदी हे अश्वमेध विजेते योद्धे आहेत हे त्यांनी फार पहिल्यापासूनच ओळखले . गोवाअधिवेशनात मोदिन्च्या नावाची अधिक्रुत घोषणा ही फार फार नंतरची बाब आहे . जेटली – गोयल यांनी त्याच्या कितीतरी आधीपासून मोदी साहेबांनासक्रिय पाठिंबा दिला आहे . याबाबत मा . निर्मलाजी सीतारामन आणि मा . श्री . जयंत सिन्हा यांची नावेही चर्चेत येऊ शकतात . पण या सगळ्यांतमा . श्री . पीयूष गोयल यांचे पारडे अरुण जेटली साहेबांची जागा घेण्यास मला जड वाटते .
जर कदाचित खरोखरच श्री . पीयूष गोयल हे केंद्रीय अर्थमंत्री झालेच तर आजमितिला त्यांच्याकडे असणारा ” एकत्रित ” उर्जा खात्याचा कारभार मा .श्री . जयंत सिन्हा यांच्याकडे जाऊ शकतो . श्री . जयंत सिन्हा यांची अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून असणारी अत्यंत वाखाणणयाजोगी असणारीकामगिरी आणि आजपर्यंत नोटा – बदलीच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारची बाजू जर सर्वात जास्त प्रभावीपणे जर कोणी मांडली असेल तर ती श्री जयंतसिन्हा यांनी हे दोन घटक याबाबत नक्कीच त्यांच्या बाजूने उभे राहतील . पण जर यदाकदाचित या खात्याचे मंत्री म्हणून जर जयंत सिन्हा यांना संधीमिळाली नाही तर ती संधी मा . निर्मलाजी सीतारामन यांना मिळेल असा माझा अंदाज आहे .
अजून एक ओझरता , पुसटसा विचार किंवा शक्यता . . . अगदीच लगेचच होईलच असेही नाही . . . पण मला वाटणारी शक्यता म्हणजे आपल्यामहाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश . शब्द समावेश असा आहे . वर्णी असा नाही . त्यामुळेजेंव्हा केंव्हा असा बदल होईल तेंव्हा मा . श्री . देवेंद्रजी फडणवीस यांना केंद्रात चांगलेच खाते मिळेल . आणि जर खरोखरच देवेन्द्रजी केंद्रीय मंत्री झालेतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मा . श्री . प्रकाशजी जावडेकर किंवा मा . श्री . चंद्रकांतदादा पाटील यांना मिळू शकेल .
अर्थातच हे सगळे अंदाज आहेत . पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांची खासियतच मुळी सर्वांचे अंदाज ( चांगल्या अर्थाने )’चुकवन्याची आहे .
(ही माझी वैयक्तिक मते आहेत . )
— चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-Mail : tilakc@nsdl.co.in
Leave a Reply