दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने अचानक रु. 1000 व रु. 500 च्या नोटा चलनामधून बाद करत असल्याची घोषणा केली आणि देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती या पूर्वी देशात कधीच निर्माण झाली नव्हती. या मूळे सर्वसामान्य लोकांची पंचाईत तर झालीच पण बँकांवर प्रचंड ताण पडला आणि काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी, पैसे भरण्यासाठी व पैसे काढण्यासाठी लोकांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागू लागल्या. एटीएम मशीन्स बंद असल्यामूळे बँकांवरचा ताण आणखीच वाढला. रोख पैशांचा तुटवडा, बँकांना होणारा मर्यादीत कॅशचा पुरवठा, सतत बदलणारी रिझर्व्ह बँकेचे नियम आणि धोरणे या मूळे गोंधळात अधीकच भर पडली. पण या कठीण काळात अनेक बँकांनी उत्कृष्ट काम केले. या मधील एक बँक आहे पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाची दत्तवाडी ब्रॅन्च!
या बँकेतही लोकांची अभूतपूर्व गर्दी होत होत होती. स्टाफला रोज 12- 12 तास काम तर करावे लागत होतेच पण जेवायला सुद्धा फुरसत मिळायची नाही. अर्था तास लंच पिरीयड असताना 10 ते 15 मिनीटांमध्ये घाईघाईने लंच उरकून यावे लागे व ते सुद्धा आळिपाळीने लंचला जाऊन. रोजच नवीन संकटे, नवीन समस्या, नवीन अडथळे असायचे. लोकांचे वेडेवाकडे प्रश्न, त्यांचा रोष, त्यांची नाराजी, संताप, कुचकट बोलणे याला तोंड द्यावे लागायचे. पण बँकेच्या सगळ्याच स्टा॑फने ही परिस्थिती खंबीरपणे आणि उत्कृष्टपणे हाताळली. मी अनेक वेळा बँकेचे मॅनेजर निळकंठ जमादार यांना हात जोडून व विनम्रपणे लोकांना सहकार्य करण्याची विनंती करताना पाहीले. बँकेच्या ऑ॑फीसबॉयपासून मॅनेजरपर्यंत सर्वजणच लोकांच्या मदतीला तत्पर असायचे. बँकेच्या टोकन सिस्टीमचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला. टोकन घेतल्यावर किती वेळाने नंबर येईल हे सांगण्यासाठी विशेष स्टाफची नियुक्ती करण्यात आली होती. बर्याँच वेळाने नंबर येणार असेल तर लोक घरी जाऊन किंवा इतर कामे करून बँकेत परत येत असत. त्यामूळे बँकेतल्या गर्दीवर नियंत्रण रहात असे. मी पुण्यातल्या इतर बँकांमध्ये अशा प्रकारची सिस्टीम बघीतली नाही. जेष्ठ नागरीकांची पण खास काळजी घेण्यात येत होती. त्या मूळे नोटबंदीच्या या कठीण काळातही या बँकेचे कामकाज सुरळितपणे पार पाडले. लोकांनीही उत्तम प्रतीसाद दिला आणि सहकार्य केले. कोणताही गैरप्रकार झाला नाही. यासाठी बँकेचे निळकंठ जमादार, संगीता पटवर्धन, महादेवी स्वामी, सुजाता जमादार, मंजुशा नथी, ज्योती नातू, निवृत्ती चहाणे, सुनील सुखात्मे, स्वाती मोने, दिलिप देवकाते, सपना रहाटे, विजय, अनिल दानवे, पुर्वा जोशी या सर्व कर्मचार्यांदचे योगदान आहे.
आपण अनेक वेळा बँकेच्या कर्मचार्यांोना नावे ठेवत असतो किंवा तक्रारी करत असतो. पण त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल मात्र घेत नसतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दत्तवाडी शाखेतील वरील कर्मचार्यां नी जे उत्तम काम केले याची दखल घेऊन त्यांचे नक्कीच अभीनंदन व कौतुक करणे आवश्यक आहे. माझी खात्री आहे की हे कर्मचारी यापूढेही याच सेवाभावाने काम करतील.
— उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
Leave a Reply