‘द दा विची कोड’, ‘एंजल्स अॅन्ड डिमेन्स’, ‘डिसेप्शन पॉइंट’ अशा या कादंब-यांचा जनक डॅन ब्राऊन यांचा जन्म २२ जून १९६४ रोजी झाला.
‘डॅन ब्राऊन’ यांच्या आजवर गाजलेल्या चार प्रमुख कादंबऱ्या हा- ‘द दा विंची कोड’, ‘एंजल्स अॅन्ड डिमेन्स’, रिसेप्शन पॉइंट’, ‘डिजिटल फॉरेस्ट. त्यांनी अमेरिकेतील ‘ॲमहर्स्ट कॉलेज ॲन्ड एक्झिटर ॲकॅडमी’मधून पदवी संपादन केली आणि त्याच कॉलेजात ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले. लॉस एंजल्स शहरात शिकत असताना गाणी करण्याचा शोक डॅन ब्राऊनला जडला, म्हणून त्याने नॅशनल अॅकेडेमी ऑफ साँगरायटस’मध्ये आपले नाव घातले. त्या संस्थेची संचालिका ब्लिथ न्यूलन ही होती. तिने डॅन ब्राऊनला खूप मदत केली. परिणामी ती त्याच्या प्रेमात पडली. वयाने ती त्याच्यापेक्षा मोठी होती. शेवटी १९९७ साली त्या दोघांचा विवाह झाला.
तेव्हापासून आत्तापर्यंत ती डॅन ब्राऊनला त्याच्या कामात मनापासून मदत करत आलेली आहे. डॅन ब्राऊनने त्या काळात म्हणजे १९९३ ते २००० या दरम्यान तेव्हापासन आत्तापर्यंत ती डॅन ब्राऊनला त्याच्या कामात मनापासून मदत करत आलेली आहे. डॅन ब्राऊनने काळात म्हणजे १९९३ ते २००० या दरम्यान स्वतःच्या गाण्याच्या सीडी प्रसिद्ध केल्या. त्यातील ‘डिजिटल फॉरेस्ट (१९९८) ही कादंबरी त्यांनी प्रथम लिहिली. एक महासंगणक (सुपर कॉम्प्यूटर) सरकारच्या हातात आल्यावर त्याद्वारे त्यांच्या गुन्हेगारी जगावर लक्ष ठेवता येऊ लागले. पण त्याचबरोबर कोणताही ई-मेल उघडून वाचता येणे, सरकारला शक्य असल्याने व्यक्तीच्या स्वातंत्राला धोका निमाण होऊ शकत होता. असा हा वेगळाच विषाय जगापुढे आणला गेला. महासंगणकासारखा अत्याधुनिक विषय हाताळल्याने कादंबरीत थरार आणता येणे शक्य झाले, असे जर कोणी म्हणत असेल, तर ‘द दा विंची कोड (२००३) आणि ‘एंजल्स अॅन्ड डिमेन्स (२०००) या कादंबऱ्यांचे विषय तर पौराणिक आहेत. तरीही आजवरच्या खपाचा उच्चांक झाला, तो ‘द दा विंची कोड’ या कादंबरीने. त्या आजवर जगात सुमारे २५ कोटी अधिकृत प्रती खपल्या. बनावट प्रती किती खपल्या, त्याचा अंदाज करता येत नाही. १९९४ मध्ये डॅन ब्राऊन ताहिती बेटावर सहलीसाठी गेला असताना त्याने सिडने शेल्डन याची The Doomsday Conspiracy ही कादंबरी वाचली. ती कादंबरी वाचून आपण यापेक्षा अधिक सरस कादंबरी लिह शकू’, अशी इच्छा त्याच्या मनात उफाळून आली.
त्याने मग ‘डिजिटल फॉटूरेस ही कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्याने आपल्या पत्नीबरोबर 187 Men to Avoid : A Guide for the Romantically Frustrated woman हे विनोदी पुस्तक लिहायला घेतले. पुस्तकावर आपले नाव त्याने डॅन ब्राऊनच्या ऐवजी डॅनिएल ब्राऊन असे घातले. शिवाय पुस्तकात त्याने लिहलि की, “या पुस्तकाचे लेखक हे सध्या न्यू इंग्लंड येथे राहात असून शाळेत शिकवणे व पुस्तके लिहिणे, हा त्यांचा व्यवसाय आहे. ते पुरुषांना नेहमी टाळत असतात.”
१९९६ मध्ये डॅन ब्राऊन याने शिकवण्याचा पेशा सोडून दिला व तो सर्व वेळ लिखाण करु लागला. ‘डिजिटल फॉरेस’ ही कादंबरी शेवटी १९९८मध्ये प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या विक्रीसाठी त्याची पत्नी ब्लिथ ही धडपड करु लागली. वृत्तपत्रांसाठी निवेदने करणे, टीव्हीवर डॅन ब्राऊनचे ‘टॉक शो’ करणे, वृत्तमाध्यमांसाठी मुलाखती ठरवणे, ही कामे ती करु लागली. यानंतर काही दिवसांनी त्या दोघांनी मिळून लिहिलेले, ‘द बाल्ड बुक’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. डॅन ब्राऊन याने नंतर डिसेप्शन पॉइंट’, ‘एंजल्स अॅन्ड डिमेन्स’ व ‘द दा विंची कोड या कादंबऱ्या एकामागोमाग लिहून प्रसिद्ध केल्या. यांतली ‘द दा विची कोड ही कादंबरी खूप गाजली. २००३ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी पहिल्या आठवड्यातच बेस्ट सेलर ठरली. २००६ पर्यंत जगभर या कादंबरीच्या ६ कोटी प्रती खपल्या. त्यानंतर अद्यापही या कादंबरीच्या खपाचे आकडे काही कोटींच्या संख्येने वाढतच आहेत. एवढ्या अफाट प्रसिद्धीमुळे डॅन ब्राऊनच्या बाकीच्या तिन्ही कादंबऱ्यांचाही खप असाच कोटींच्या पटींमध्ये वाढत गेला.
२००५ मध्ये ‘टाइम’ मासिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. त्यात डॅन ब्राऊनचे नाव झळकले. ‘फोर्स’ मासिकाने २००५मध्ये सिलेब्रिटी १००’ अशी श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. त्यातही डॅन ब्राऊनचे नाव आले. या मासिकाने डॅन ब्राऊन याचे वार्षीिक उत्पन्न हे सुमारे ७ कोटी, ६५ लाख डॉलर्स असावे, असे जाहीर केले. तर ‘टाइम’ मासिकाच्या मते, डॅन ब्राऊनला ‘द दा विंची कोड’ या पुस्तकाच्या खपापोटी सुमारे २५ कोटी डॉलस मिळाले असावे. डॅन ब्राऊन च्या कादंबऱ्या मधील पात्रांची नावे ही बहुतेक वेळा प्रत्यक्षातील व्यक्तींची असतात. एका मुलाखतीत त्याने आपल्या पत्नीबद्दल सांगितले की, ती ऐतिहासिक कलाकृती व चित्रकला यांतील तज्ज्ञ आहे. डॅन ब्राऊनच्या कादंबऱ्यांसाठी ती अफाट मेहनत घेऊन संशोधन करते. कोलंबिया पिक्चसने ‘द दा विंची कोड’ या कादंबरीवर चित्रपट तयार केला. रॉन हॉवर्ड या दिग्दर्शकाने तो दिग्दर्शित केला होता. परंतु या चित्रपटाबद्दल फारशी चांगली समीक्षाणे छापून आली नाहीत. तरीही या चित्रपटाने वषाभरात जगातून ७५ कोटी डॉलर्सचा गल्ला गोळा केला. यानंतर त्याच्या ‘एंजल्स अॅन्ड डिमेन्स या कादंबरीवर २००९ साली चित्रपट निघाला. कळसावर नेऊन पोहोचवणाऱ्या ‘द दा विंची कोड’ या कादंबरीनंतर डॅन ब्राऊन स्वस्थ बसला नाही. त्याने आणखी एक विषाय निवडला व त्याबद्दलची सारी माहिती गोळा करणे चालू केले. आता त्याने पुराणकथेतील माहितीचा एक तुकडा किवा एक प्राचीन समजूत यावर आधारित कथा रचण्यास सुरुवात केली. मात्र ती कथा आत्ताच्या काळात घडत असल्याने प्राचीन श्रद्धा, सवलती, परंपरा आणि आधुनिक विज्ञान या सर्वांचे मिळून एक झकास रसायन बनले.
ख्रिश्चन पुराणकथांत एके ठिकाणी महामानवाचे – सुपरमॅनचे – वर्णन केलेले आहे. ‘मानव’ व ‘इश्वर’ यांच्यामधला अत्यंत शक्तिशाली असा महामानव’ बनण्यासाठी एकाची धडपड चालू असते. मग त्यात खून, पोलीस, सीआयए गुप्तचर संस्था, वृत्त माध्यमे हे सारे काही आले परिणामी ‘द लॉस्ट सिम्बॉल’ या पुस्तकाच्या रुपाने पुन्हा एक थरारकथा जिवंत स्वरुपात उभी राहिली. अन् सारे शक्य कोटीतले वाटावे; काल्पनिक भासू नये, याची खबरदारी अर्थात डॅन ब्राऊनने घेतली. त्याच्या बाकीच्या कादंबऱ्यांवर जसे चित्रपट निघत आहेत, तसाच याही कादंबरीवर कोलंबिया पिक्चर चित्रपट काढीत आहे. २०१३ मध्ये तो चित्रपट आला आहे. डॅन ब्राऊनने सर्व धर्मांच्या पुराणग्रंथांचा अभ्यास केला. ‘बायबल’, ‘भगवदगीता’, ‘कुराण’ आदी ग्रंथांत वर्णिल्याप्रमाणे परमेश्वर व त्याची प्रजा म्हणजे ‘मानवजात’ असे नसून खुदद मानवामध्ये एवढी अमर्याद सुप्त शक्ती आहे की, त्याला स्वत:लाच ईश्वरीरुप प्राप्त होऊ शकेल किंवा तो स्वत:च ईश्वर बनेल. या कादंबरीत अवघी १८ पात्र आहेत अन् नेहमीप्रमाणे कादंबरीतील घटना या चोवीस तासांत संपतात. त्यामुळे वाचकाला फारसा विचार करु न देता नवीन-नवीन घटनांमध्ये सतत त्याला खिळवून ठेवले जाते. अशी ही कादंबरी तयार करायला मात्रा डॅन ब्राऊनला काही वर्षे लागली. १५ सप्टेंबर, २००९ रोजी हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यासाठी आधीपासून वृत्तमाध्यमातून प्रकाशकाने खूप गाजावाजा केला होता. पुस्तकाची पहिली आवृत्ती ही अर्थात एक दणकट बांधणीची, चांगला कागद वापरलेली आवृत्ती होर्ती. त्यासाठी कित्येक महिने आधी आगाऊ पैसे घेऊन नोंदणी केली गेली, होती. अमेरिका, कॅनडा व इंग्लंड येथून खूप नोंदणी झाली. इंग्लंडमध्ये पुस्तक प्रकाशन समारंभ झाला. सुमारे ६ कोटी ५० लाख प्रती त्यासाठी छापून घेतल्या होत्या. ग्रंथ छपाईच्या इतिहासात हा एक विक्रम होता. ही एक अभूतपूर्व घटना ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या पुस्तकाची छपाई कधीच झाली नव्हती.
पुस्तकाची विक्री तडाखेबंद होऊ लागली. पहिल्याच दिवशी १० लाख प्रती खपल्या. आठवड्याच्या शेवटी अमेरिका, कॅनडा व इंग्लंड येथे मिळून एकूण वीस लाख प्रतींची विक्री झाली. दर दिवशी विक्रीचे आकडे वाढत चालले होते. शेवटी जादा ६ लाख प्रती (बाउंड बुक स्वरुपातील) छापल्या गेल्या. पहिल्याच दिवशी १० लाखांच्यावर प्रती खपणे, हाही एक पुस्तक विक्रीचा उच्चांक ठरला.
न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या परीक्षाणात या पुस्तकाबद्दल ‘एकदा वाचायला घेतले की खाली ठेववत नाही’, असे लिहिले. ‘न्यूज वीक’ या साप्ताहिकाने सारखी पाने उलटायला लावणारे पुस्तक ष्ठ दुडला गेलेला इतिहास उलगडून दाखवणारे पुस्तक ष्ठ चक्रव्यूह निर्माण करणे त्यातून आपल्याला माग काढायला लावणे पुस्तक ष्ठ’ अशी या पुस्तकाची भलावण केली. असे हे अफलातून पुस्तक वाचल्यावर उत्कृष्ट साहित्य हे फक्त लेखकाच्या कष्टावर, बुद्धिमत्तेवर व प्रतिभेवर अवलंबून असते, हे मराठी वाचकांना पटेल आणि मराठी लेखकांनाही पटावे!
त्यांच्या कादंबऱ्यांचे ५२ विविध भाषांत अनुवाद झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांच्या २० कोटी पेक्षा जास्ती प्रती विकल्या गेल्या आहेत. मराठीतील बहुतेक अनुवादित पुस्तके पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहेत.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ अशोक पाध्ये
पुणे.
Leave a Reply