“माणसाचं मन हे सर्जन व सृजनशील असलं की प्रयोशीलता ही उदयास येते आणि त्यातून निर्मिती होते दर्जेदार कृतीची, नृत्या सारख्या कलेत सतत नवनवीन प्रयोग करुन, समृद्धीच्या शिखरावर नेऊ पहाणार्या युवा नृत्य दिग्दर्शक जितेंद्र निकम चा प्रवास.”
आपल्या मुलांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन, पुढे एखादी सरकारी अथवा निमसरकारी सेवेत नोकरी असं काहीसं चित्रसर्वसाधारण मराठी कुटुंबामध्ये पहायला मिळतं, पण काही मुलं याला अपवाद असतात, जितेंद्र निकम सारखे आपण एक नृत्यकार म्हणून कारकीर्द घडवू शकतो, आणि या कलेत नवीनता, प्रयोगशील आणि सातत्य ठेऊन ही कला सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत नेऊन ज्ञान आणि रंजनता प्रदान करु शकतो, असं महाविद्यालयीन जीवनामध्ये जितेंद्रला वाटू लागलं, आणि मग नृत्याचा क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निश्चय केला. त्याआधी महाविद्यालयीन स्तरावर नाटकांमधून भूमिका ही केल्या, यात उल्लेख करण्याजोगी “तळीराम” ही “एकच प्याला” या नाटकातील व्यक्तीरेखा. नाटकांमध्ये कामाचा अनुभव नृत्यात ही उपयोगी आला. कारण “थेट परफॉर्मन्स” हे सूत्र दोन्हीकडे लागू पडतं.
आत्तापर्यंत जितेंद्रनी “वेस्टर्न फ्री स्टाईल”, “बॉलीवुड”, “हीप हॉप”, “क्युबन साल्सा”, “शास्त्रीय” तसंच “लोकनृत्याचं” शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं आहे. इतकच नाहीतर जगातील कोणत्याही नृत्य प्रकारामध्ये वैविध्यता कशी दाखवता येईल याचा कटाक्ष तो पाळतो. केवळ स्वत: नृत्याचं प्रशिक्षण घेऊन तिथेच न थांबता, नृत्य कला टिकून रहावी यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, कल्याण या भागात नामवंत शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.
गेल्या ६ वर्षांपासून शिक्षक म्हणून वावरत असताना देखील, अनेक व्यावसायिक सोहळ्यांमधून आपल्या सहकार्यांना प्रशिक्षण देऊन प्रेक्षकांना स्मरणात रहातील असे नृत्य अविष्कार सादर करण्याचा त्याचा मानस राहिला आहे. कधी “डान्स-कम-ड्रामा” कधी “पारंपारिक” तर कधी “पाश्चिमात्य” शैलीची अदाकारी, हे सर्व परफॉर्मन्स किमान एकदातरी “वन्स मोर” ची मागणी करणारे, “पण याचं सारं श्रेय माझ्या टीमला जातं”. असं जितेंद्र नमूद करतो.
खरंतर कलेचं क्षेत्र जिथे बरीचशी स्पर्धा, आणि आर्थिकरित्या अस्थिरता पहायला मिळते, अशातच पूर्णवेळ कारकीर्द घडवायची हे भलंमोठं आवाहनच पण त्यासाठी अनेक वाटा निर्माण होताहेत; कोरियोग्राफर, नृत्यप्रशिक्षक, रियालिटी शो यामुळे आता बर्याच गोष्टी या क्षेत्रात सोप्या होत असून, भारतातील नृत्य प्रकारांना ही जागतिक व्यासपीठ मिळाल्याचं जितेंद्र सांगतो.
राष्ट्रीय स्तरांवर होणार्या नृत्याच्या मोठ्या सोहळ्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये ही जितेंद्र निकम नी सहभाग नोंदवला आहे. तसंच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन २०० पेक्षा ही अधिक परफॉर्मन्स दिले असून, त्याव्यतिरिक्त ५ “म्युझिकल व्हिडिओ” मध्ये सुद्धा नृत्य सादर केलं आहे.
दूरचित्रवाणी, चित्रपट आणि स्टेज शोज या मध्ये “लाईव्ह परफॉर्मन्स” हा सर्वात आव्हानात्मक आहे, कारण जे होईल ती अखेरची असते, पण त्यामध्ये नवीन प्रयोग हीकरता येऊ शकतात असं जितेंद्रच्या नृत्याच्या अनुभवांमधून त्याच्याशी बोलताना लक्षात येतं. म्हणून प्रत्येक “स्टेज शोज” मधून काहीतरी नवीन,रंजक देण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आहे.
सध्या अनेक हिंदी व मराठी सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शनात व्यग्र असलेल्या जितेंद्र निकम एका गोष्टीकडे लक्ष वेधलो ते म्हणजे, या क्षेत्रात मराठी मुलांची या क्षेत्रासाठी असलेली अनास्था; अर्थात प्रमाण तुलनेनं कमी असल्याचं त्याचं म्हणणं आहे, पण हळू हळू मुलांमध्ये परिवर्तन होतय, या क्षेत्राकडे लोकांची पहाण्याची दृष्टी बदलते आहे, जे नृत्याच्या भवितव्यासाठी सकारात्मक नांदीच म्हणावी लागेल.
आतापर्यंतच्या कारकीर्दीत जितेंद्र निकम ला अनेक सन्मान आणिपुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे, यामध्ये वयाच्या अवघ्या विशीत नृत्य कलेत निपुणता मिळवून स्वत:चीवेगळी ओळख प्रस्थापित करुन, एक आदर्श शिक्षक आणि गुणी तरुण म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जितेंद्र निकम ला “हॅटस् ऑफ”, आणि सदीच्छा ही !
Leave a Reply