गणराज नाही रंगले नाही नाचले
गोकुळी सारे नाचून नाही दमले
वीणा नाही वाजली या शारदेची
थुईथुई की हो थांबली सर्व मोराची
डफावर नाही पडली शाहिराची थाप
आवेशाची तिडीक जिरली आपोआप
ढोलकीच्या तालावर नाही थिरकले हात
लावण्याने नाही रंगली रसिकांची रात
अबोल का ग झालीस तू आता सतार
कुणाचीही फिरली नाहीत बोटे हळुवार
टाळ बोले चिपळीला आता कुणाला देऊ साथ
मंदिरातही एकलीच तेवत आहे समयी ती शांत
आता शाळेत होत नाहीत नृत्य आणि गायन
तबल्यावर ही हो नाही ता तक ता धीन धीन
कोरोनाच्या थैमानाने होत आहेत अनेक मृत्य
शिवशंकरा उघड आता तिसरा डोळा आणि सुरु कर तांडवनृत्य
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply