नुरली ,जगती कुठलीच नाती आता
प्रेम जिव्हाळा वात्सल्य संपले आता
सारासाराच आता भासतो दिखावा
सुंदरताही , रमली कृत्रिमतेत आता
खरी सुखदा , खरे सौन्दर्य संभ्रमात
कलियुगी, मृगजळाचीच ओढ आता
माणुस ! माणसाचेच निर्दयी खेळणे
निर्माल्य ! कोवळ्या फुलांचेही आता
कुठल्या रूढी आणि कुठल्या परंपरा
निर्बंधीच साऱ्यांचेच इथे जगणे आता
स्वार्थी ! बेछूट प्रीतभावनांची दुनिया
नको कुणीच मी एकटाच सुखी आता
नुरले नाते आता वेलीचे अन फुलांचे
साऱ्या संवेदना जाहल्या शुष्क आता
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१५४.
१६ – १२ – २०२१.
Leave a Reply