कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी
अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी
परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी
उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी
दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी
शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी
बळी कुणाच्या पडली तू गे, मार्ग रोखीले तुझे कसे ते
अपयश येता सत्यालाही, म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’
आज न आले यश जरी, न्याय येईल उफाळूनी
अंतिम विजय हा सत्याचा, जाणीव आहे ह्याची मनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply