दोसा असतो कसा छान जाळीदार
मन मोकळे जसे असते त्याचे आरपार
इडली सदाच टम्म फुगलेली.
साधीदार सांबार नसला की असते रुसलेली
खमंग खुसखुशीत आप्पे गोल गोल
गरम गरम असतानाच खाणार किती बोलबोल
आंबट ताकातली खमंग फोडणीत उकड शिजते रटरटा
डोळे मिचकावत खायचे मस्त गटगटा
कुणी म्हणतात उप्पीट तर कुणी ऊपमा
या साठी बऱेच पदार्थ करावे लागतात जमा
शिरा याचा मान तर असतो खूपच मोठा
तूप साखर. बदाम. काजू यांचा असतो ना साठा
साधे सरळ सोपे नाती जुळवणारे कांदे पोहे
कुणीही या कधीही या ते तयारीतच आहे.
सांगा सांगा लवकर सांगा. तुम्हाला काय आवडते ते लवकर सांगा
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply