५ जानेवारी १९७१ रोजी पहिला एकदिवसीय क्रिकेटचा सामना मेलबोर्नच्या मैदानावर खेळवण्यात आला. क्रिकेटमधील एका अपघाताने एकदिवसीय क्रिकेटचा जन्म. या दिवशी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात मर्यादित सामना खेळवण्यात आला होता. हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला एकदिवसीय सामना ठरला. अनपेक्षितरीत्या हा क्रिकेट प्रकार अस्तित्वात आला. १५ मार्च १८७७ रोजी सुरू झालेले कसोटी क्रिकेट हे १ जानेवारी १९७१ पर्यंत अव्याहतपणे सुरू होते. परंतु त्यादिवशी नियती काही वेगळ्याच मूडमध्ये होती. १ जानेवारी १९७१ ते ५ जानेवारी १९७१ या दरम्यान ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या दोन संघांदरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या चार दिवसांचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. प्रेक्षकांचे पैसे वसूल होण्याच्या दृष्टीने मर्यादित षटकांचा सामना खेळवण्याची एक कल्पना एका भन्नाट डोक्यातून निघाली. तिला मूर्त स्वरूप येऊन ५ जानेवारी १९७१ रोजी प्रत्येकी ४० षटकांचा एक सामना वरील दोन्ही संघांदरम्यान खेळला गेला. त्याला तब्बल ४६ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली.
इंग्लंडने ३९.४ षटकांत १९० धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाने ३४.६ षटकांत ५ गडी बाद १९१ धावा करून ५ गड्यांनी सामना जिंकला. दोन्ही संघांनी मिळून इंग्लंडच्या जॉन एड्रिचने सर्वाधिक ८२ धावा (४ चौकार) ६८.९० च्या सरासरीने काढल्या व सामनावीर ठरला. अशा रीतीने क्रिकेट विश्वामध्ये अधिकृत एकदिवसीय क्रिकेटचा जन्म झाला.
त्यावेळीच हा नवा प्रकार क्रिकेटरसिकांना मानवणारा असल्याचा साक्षात्कार त्या वेळच्या संघटकांना झाला. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणेच पहिल्या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियानेच इंग्लंडला हरवले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply