नवीन लेखन...

ओडीसा राज्यातून इटालीयन पर्यटकाचे अपहरण (कथा ७)

ही अशी होती जाहिरात:-

‘तुम्हाला ताज महाल पेक्षा दुसरा भारत अनुभवायचा असेल,तर आदिवासी  वस्ती पर्यंत पोहचा,जे अजूनही धनुष्यबाण व इतर प्राचीन आयुधे वापरतात, फोटो काढण्यांसं तयार होत नाहीत.घनदाट जंगलात जंगली श्वापदा बरोबर मुकाबला करतात,हे पाहण्यासाठी भरपूर पायी प्रवास करावा लागेल,प्रवास सुरक्षित असेल याची हमी,तर  जरूर या भेटीला ओडीसा राज्यात.

ही जाहिरात एक धाडसी इटालीयन प्रवासी Paulo Boshusko जगन्नाथपुरी येथील एका टपरीवजा दुकानात करत असे. गेली १९ वर्षे. वर्षातील ६ महिने या जागी ठाण मांडत असे. स्वता:च्या वेब साईट वरून या जागेची जाहिरात वाचून युरोप अमेरिकेतील धाडसी प्रवासी या जागी येत असत. डोंगर, दऱ्या , जंगले, नदी काठ येथील आदिवासी वस्ती जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळत असे.ओडीसा राज्या तील सुंदरगड, मलकांगरी, कंधमाल, रायगडा. गजापती. कालाहंडी, कोरापूर, आंग्ल, कटक, पुरी असा २० दिवसांचा प्रवास चालत करावा लागे.खर्च ४० युरो प्रत्येक दिवशी, ( २१०० रु. ) ८ जणांचा ग्रुप असे.हाच त्याचा पोटापाण्याचा धंदा, वेब साइटवर या भागाचे  अप्रतीम फोटो टाकलेले, हौशी पर्यटक एकदम खुश, त्याच्या जवळ भारताचा व्यवस्थित व्हिसा असून  हा धंदा बीनबोभाटपणे चालवीत आहे. ओडिया भाषेवर उत्तम प्रभुत्व, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करत असल्याने पर्यटकांचा सतत ओघ होता.

या जंगल विभागात नक्षलीना शिक्षण देण्याची जागा असल्याने पोलीस या भागात फिरण्यास मज्जाव करतात.तरीपण ही आज्ञा झुगारून हा मालक व दुसरा विदेशी पर्यटक दोन ओडीसा लोकांबरोबर जंगलात पर्यटना करता गेले,नक्षलीनी त्यांचे अपहरण केले. काही दिवसानी ओडीसा लोकांना सोडून दिले, पण परदेशी प्रवासी सोडण्यासाठी अनेक अटी घातल्या आहेत.आदिवासी बायकांचे नदीत आंघोळ करतानाचे फोटो काढल्याचा आरोप आहे,जागतिक दबावाखाली भारत सरकारवर नाहकपणे दडपण येत आहे.अशा गंभीर समस्येमुळे प्रश्न अधीकच गुंतागुंतीचा होत आहे.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..