नवीन लेखन...

मराठी चित्रपटांचा ऑफबीट ट्रॅक

२०१४ चे अर्धवर्ष सरत असताना आपल्या मराठी चित्रपटांचा कानोसा घेताल्यावर एक बाब लक्षात येईल की पारंपारीक चौकट मोडून समांतर तसंच “ऑफबीट” विषयांच्या सिनेमांची निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. कुठेतरी सिनेमा हे माध्यम म्हणून लोकांपर्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत कशा पध्दतीने पोहचेल असा विचार सध्याचे चित्रपट निर्माते करतना दिसताहेत; तंत्रात आधुनिकतेसोबतच, मार्केटींगचा प्रभावी वापर हे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल…

या वर्षाची सुरुवात झाली ती “टी.पी” ने. अहो टी.पी म्हणजे टाइमपास हा सिनेमा. दगडू आणि प्राजक्ताची कोवळ्या वयातील लव्हस्टोरी खुपच गाजली व रेकॉर्डब्रेक कमाई करत, “बॉक्सऑफीसवर नवा अर्थ रुजवला”. खरं पहायलं तर प्रेमाचे वेगळेपण अधोरेखीत करणारे चित्रपट आपल्या भेटीला नेहमीच येत असतात. पण प्रमोशनचा फण्डा आता मराठी निर्मात्यांचा लक्षात येऊ लागल्यामुळे प्रेमाची गणितं सुध्दा हिट ठरु लागलीय. त्याचेच दुसरे उदहारण म्हणजे “फॅंड्री”. प्रेमाचा विषय आणि जातीव्यवस्थेवर अगदी नेमकेपणाने मांडलेल्या आशयामुळे हा चित्रपट काळजाला भिडला आणि जगभरात कौतुकाची व पुरस्काराची थाप मिळवून गेला. आणखीन एक चित्र गेल्या सहा महिन्यांमध्ये रुपेरी पडद्यावर पहायला मिळालं ते म्हणजे “ऑफबीट प्रकाराच्या विषयाचे” ट्रेंड हळूहळू आपल्याकडे रुजायला सुरुवात झाल्यामुळे जागतिक स्तरावर त्याचं बळकट होत जाणारं स्थान आगामी काळात प्रदर्शित असत होणार्‍या चित्रपटांना पोषक असंच ठरणार आहे !

एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे राष्ट्रीय पुरस्कारांवर तब्बल ९ वेगवेगळ्या विभागांमध्ये मराठी चित्रपटांनी ठशठशीत मोहोर उमटवली आणि राष्ट्रीय स्तरावरील मराठी चित्रपटांची पताका दिमाखाने फडकत ठेवली ! पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक , ज्युरी अॅवॉर्ड फॉर बेस्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, स्पेशल मेंशन अॅवॉर्ड्स, सर्वोत्कृष्ट संवाद या विभागांमध्ये पुरस्कारावर नाव कोरत हिंदी पाठोपाठ द्वितीय स्थानावर आपल्या चित्रपटांनी कमालीची बाजी मारली आहे. हे पुरस्कार यंदा नवोदित कलाकारांना मिळाल्यामुळे, नवं टॅलेण्ट नव्या संकल्पाना घेऊन पुढे येतेय हे सिध्द होत आहे. या पुरस्कारांवर येलो, अस्तू, आजचा दिवस माझा, फॅंड्री अश्या ऑफबीट विषयातले चित्रपट असल्यामुळे भारतातील अनेक प्रांतातल्या “फिल्ममेकर्स”ने मराठीत पदार्पण करण्याचे विचारात घेतले आहे. आणि याची व्यापती इथून पुढे देखील आपल्याला वाढलेली दिसेल.

“अ रेनी डे”, “आजोबा”, “भाकरखाडी ७ कि.मी.”, “म्हादू”, “पोस्टकार्ड”, “धग”, “जयजयकार”, “१९०९”, “सलाम”, “तप्तपदी”, “एक हजाराची नोट”, “सौ.सशी देवधर”, “यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची”, अशा वेगळ्या विषयाच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना अंतरर्मुख करायला लावून समाजातील बारकावे टिपण्याचा याशस्वी प्रयत्न केला आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये “रेगे”, “लोकमान्य”, “एक तारा”, “डॉ.प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो”, “रेला रे”, “लय भारी”, “गोप्या”, “जागरण”, “बायस्कोप”, “विटी दांडू”, “पोश्टर बॉइज”, “अनवट”, “खेळ तमाशा”, “बाजी” यासारखे समाजिक, व्यकती केंद्रीत, राजकीय अणि अॅक्शन बेस्ड विषय असलेले चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. उल्लेख करावा लागेल तो म्हणजे “लय भारी” या चित्रपटाचा. रितेश देशमुख यानिमित्ताने प्रथमच मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करतोय. तर “पोरबाजार”च्या निमित्ताने मनवा नाईक दिग्दर्शक म्हणून आपलं करियर नव्याने फुलवतेय, तर सखील परचुरे, धर्मज जोशी, सत्या मांजरेकर अशी “स्टार पोरं” रुपेरी पडद्यावर पदापर्न करत आहेत. यापैकी अनेक चित्रपटांनी विविध महोत्सवांमधून चमकदार कामगिरी पार पाडली आहे. आता पहायचं आहे की प्रेक्षक या चित्रपटांना कसा स्वीकारतो.

संगीत, लेखन, लोकेशन्स, दिग्दर्शन, तांत्रिक व निर्मिती मूल्यांमध्ये आपला चित्रपट कात टाकत असल्यामुळे एकूणच मराठी सिनेमाचं नवीन पर्व उदयाला येते आहे. त्यामुळे उदयोन्मुख कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्या कौशल्याचं दर्शन घडून जागतिक आयाम प्राप्त होईल हे पण तितकेच खरे. आता फक्त गरज आहे मराठी प्रेक्षकांनी आपल्या चित्रपटांना केवळ मनोरंजन म्हणून न पाहता प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याची आणि वेगळ्या धाटणीच्या निर्मितीला सर्वतोपरिने प्रोत्साहन देण्याची ! कारण अशा “ऑफबीट टॉपीक्स” मुळेच चित्रपटांचा प्रवाह कायम रहातो, आणि हा आजवरचा इतिहास आहे.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..