नवीन लेखन...

आक्रमक फलंदाज फारुख इंजिनिअर

फारुख इंजिनिअर यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला.

फारुख माणेकशा इंजिनिअर हे त्यांचे पूर्ण नाव. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टीच्यामुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिले. १९६० आणी ७० च्या दशकात भारतीय फिरकी चौकडी विजयामागुन विजय मिळवुन देत असताना फलंदाजा जवळच्या क्षेत्ररक्षकांचा एक चपळ गट संघात सतत होता. फारुख इंजिनिअर हे या गटाचे केंद्रवर्ती स्थान मानावे लागेल. या गटात एकनाथ सोळकर, अजित वाडेकर, श्रीनिवास वेंकटराघवन, सय्यद अबिद अली अशा दिग्गज क्षेत्ररक्षकांचा समावेश होतो. केसांना “वळण” लावणार्या बेलक्रिम नावाच्या ब्रँडने फारुखशी जाहिरातीसाठी करार केला होता. डेनिस कॉम्प्टन ह्या इंग्लिश कसोटिपटुला प्रथम असा बहुमान मिळाला होता. तेव्हा इंजिनिअर हा भारताचा कॉम्प्टन ठरतो ! ऐन भरात असलेला फारुख इंजिनिअर होताच तसा लोभसवाणा.

वयाच्या तेविसाव्या वर्षी कानपुरात इंजिनिअर यांनी कसोटीत पदार्पण केले. सुरवातीच्या काळात त्यांना बुद्धिसागर कुंदरन ह्या दुसर्याप यष्टिरक्षकाचे संघातील जागेसाठी आव्हान होते. इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या मालिकेत खेळल्यानंतर वेस्ट इंडिज दौर्यायवर या दोघांना वाटुन-वाटुन सामने मिळाले. कुंदरन दोन सामन्यांमध्ये खेळले तर इंजिनिअर तीन. फलंदाजित कुणाचिच कामगिरी चांगली झाली नसली तरी तुलनेत इंजिनिअर बरा खेळला.

१९६३-६४ च्या हंगामात कुंदरनला संघात स्थान मिळाले आणी फलंदाजित चांगली कामगिरी करुनही न्युझिलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत एका कसोटिनंतर पुन्हा इंजिनिअरची संघात वर्णी लागली. नंतर गारफिल्ड सोबर्सच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या संघाविरुद्ध कुंदरनने ७९ धावा काढल्या आणी नवव्या जोडीसाठी वेंकटराघवनसोबत ९५ धावाही जोडल्या. तरीही तिसर्याय कसोटी साठीच्या संघात इंजिनिअरला स्थान मिळाले ! टिका होणे स्वाभाविक होतेच. मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५. उपाहारापूर्वीच्या खेळात कुणाही भारतीय फलंदाजाने त्याआधी एवढ्या धावा काढलेल्या नव्हत्या. उपाहारानंतर १०९ धावांवर अखेर “फारुख” बाद झाले. एक खमक्या सलामीवीर-यष्टिरक्षक-फलंदाज आता भारताला गवसला होता ! १९७०-७१ च्या हंगामात गावसकरचा उदय झाला आणी १९७४-७५ च्या हंगामात इंजिनिअर निवृत्त झाला.

इंजिनिअर आपली अंतिम वनडे मैच १४ जून १९७५ रोजी न्यूजीलैंड क्रिकेट टीमच्या विरुद्ध खेळले होते. दरम्यानच्या काळात ह्या दोघांनी प्रत्येक डावात सरासरी ४५ च्या गतीने संघाला सलामी दिलेली होती. ह्यात दोन शतकी सलाम्यांचा समावेश होता. १९७१ साली भारताने पहिल्या प्रथम इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. ओव्हलवरच्या त्या निर्णायक कसोटित गुंडप्पा विश्वनाथ आणी फारुख इंजिनिअर यांनी विजय समिप आणला होता आणी विश्वनाथ बाद झाल्यानंतरही मोठ्या धैर्याने इंजिनिअर खेळत राहिला होता. विजयानंतर हौशी प्रेक्षकांनी फारुखला खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला पण हा इंजिनिअर फारच भारदस्त असल्याने त्यांना तो नाद सोडुन द्यावा लागला!

टोनी लुइसच्या नेतृत्वाखाली १९७२-७३ च्या हंगामात भारतात आलेल्या इंग्लिश संघाला नमवुन अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग तिसरा मालिका विजय नोंदविला. ह्या मालिकेत फारुख यांची कामगिरी अतिशय सुरेख झाली. ४१५ धावा, १२१ सर्वोच्च, तीन अर्धशतके तथा बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर सारख्यांना यशस्वीपणे घेण्याची कामगिरी.

पुढच्याच हंगामात इंजिनिअरची कामगिरी खालावली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटित तो दोन्ही डावात शुन्यावर बाद झाला. हीच कसोटी त्याची अखेरची ठरली. निवृत्त होताना त्याच्या खाती जमा असलेल्या २६११ कसोटी धावा खास फलंदाज म्हणुन संघात असणार्याो अजित वाडेकर आणी दिलिप सरदेसाई यांच्यापेक्षा सरस होत्या.

वर्णद्वेषी धोरणांमुळे दक्षिण आफ्रिकेचा १९७१-७२ च्या हंगामातिल ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्यानंतर गॅरी सोबर्सच्या नेतृत्वाखालील एक आंतरराष्टीय संघ तिकडे गेला होता. त्या संघात ॲ‍लन नॉटसारख्या यष्टिरक्षकाला मागे टाकुन इंजिनिअर यष्टिरक्षक म्हणुन निवडला गेला होता आणी ब्रॅडमनने इंजिनिअरवर स्तुतिसुमने उधळली होती. सुनिल गावसकरने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले आहे की नर्मविनोदी शैलित सतत काही ना काही बोलत राहुन फारुख इंजिनिअर आसपासच्या क्षेत्ररक्षकांना ‘सावध’ ठेवित असे. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर : “बोलत का नाहिस? रात्री प्लेबॉय वाचल्यापासुन फारसा बोलत नाहिएस तू !”

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ: इंटरनेट/ डॉ. आनंद बोबडे

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..