श्री गणेशाला दूर्वा वहाणे
श्री गणेशाला २१ दूर्वा वहाव्यात. श्री गणेशाला वहायच्या दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. समिधा एकत्र बांधतो, तशा दूर्वा एकत्र बांधाव्यात. एकत्रित बांधल्याने त्यांचा गंध बराच काळ टिकतो. यासाठी दूर्वा अधिक वेळ टवटवीत रहाव्यात, म्हणून पाण्यात भिजवून मग वहाव्यात.
दूर्वा वहातांना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा.
श्री गणेशाला लाल फूल कशाप्रकारे वहावे ?
श्री गणेशाला लाल फूल वहाणे
श्री गणेशाचा वर्णलाल आहे. गणेशपूजेत तांबडे वस्त्र, लाल फूल अन् रक्तचंदन वापरतात.
त्यामुळे पूजेतील मूर्ती जागृत होण्यास साहाय्य होते.
फूल वहातांना फुलाचा देठ देवाकडे आणि तुरा आपल्या दिशेने येईल, अशा तर्हेने फूल देवाला वाहावे.
Leave a Reply