तुम्ही काहीही करीत असलात आणि कुठेही असलात तरी तुम्ही थोडा वेळ काढा आणि इंग्रजी भाषेतील OK या शब्दाकडे तुमचे लक्ष वळवा .
हा शब्द तुम्ही स्वतः अनेक वेळा उच्चारला असाल आणि असंख्य वेळा इतरेजनांकडून ऐकलेला असाल . कुणी तो OK असा वापरतात तर कुणी Okay असा . या शब्दाला मुद्रित अवस्थेत अवतीर्ण होण्यास आज १७५ वर्षे उलटली आहेत अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या ‘ द बोस्टन मॉर्निंग पोस्ट ‘ या दैनिकात OK हा शब्द सर्वप्रथम प्रसिद्ध झाला . ‘मला असं वाटतंय की OK चे स्वागत संचलन ( Parade ) आणि त्याच्याविषयी व्याख्यानमाला आयोजित करून केले पाहिजे . इलिनॉईस ( अमेरिका ) येथील इंग्रजीचे प्राध्यापक अॅलन मेटकाफ म्हणतात . ते OK शब्दाचा अर्थ आणि इतिहास यावरील जागतिक स्तरावरील अधिकारी तज्ज्ञ मानले जातात . ‘ येवढं नाही जमलं तरी इतर मार्गाने OK ची शंभरी साजरी केली तरी OK
या प्राध्यापक महाशयांनी २००१ साली ‘ OK ‘ वर एक पुस्तक प्रसिद्ध केले . ‘ The Impropable story of America’s Greatesh Word . ‘
‘ OK ‘ विषयी प्राध्यापक महाशय पुढे आणखी म्हणतात ‘ हा शब्द या पृथ्वी ग्रहावर वारंवार उच्चारला वा टंकलिखित वा लिहिला जातो . ‘ कोक ‘ किंवा तान्हुल्याचा ‘ ला ‘ ( आई ) या शब्दांपेक्षाही जगात अधिक म्हटला जाणारा शब्द म्हणजे ‘ OK . ‘ संक्षिप्त आणि अत्यंत उपयुक्त आणि साधेपणात हा शब्द जन्मजात अमेरिकन आहे . त्याची व्युत्पत्ती बघितली तर त्याचे मूळ लॅटिन किंवा ग्रीक भाषेत मिळू शकणार नाही . एवढेच नाही तर ज्या प्राचीन म्हणून भाषा गणल्या जातात त्यातही ते सापडणार नाही .
OK हा शब्द स्कॉटिश भाषेतील Ochaye या ग्रीक भाषेतील Olakala ( धन आहे हं ) किंवा फ्रेंचमधील aucayes शब्द समूहातून जन्मला असल्याचा जो अंदाज वर्तविला जातो , तो ऑक्सफर्ड शब्दकोशांच्या संकेतस्थळावरून फेटाळून लावण्यात आलेला आहे .
१८३० सालच्या सुमारास इंग्रजी भाषा बोलणाऱ्या प्रदेशात शब्दांची चुकीची अक्षररचना करण्याचे पेव फुटले होते . त्यावेळी all correct हा शब्द Ori Korrekt असा लिहिला जात असे . त्याचे संक्षिप्त रूप म्हणून OK हा शब्द पुढे आला असावा , हा सिद्धांत बराचसा मान्य केला जातो .
OK चा पहिला मुद्रित उपयोग शोधून काढण्याचे श्रेय कोलंबिया विद्यापीठात काम करणाऱ्या अॅलन वॉकर रीड या प्राध्यापकाला दिले जाते , तो २००२ मध्ये मरण पावला . त्याने आयुष्यभर ‘ OK ‘ शब्दाच्या इतिहासाचा शोध घेतला . आणि दुसऱ्या एका इंग्रजी शब्दाच्या उगमस्थानाचा . तो शब्द F ने सुरू होतो .
OK . See you again
Leave a Reply