पौराणिक महत्व:
आध्यात्मिक, ऐतिहासीक, पौराणिकदृष्ट्या नर्मदा ही कुमारिका समजली जाते व तिच्या परिक्रमेला अनन्य महत्व आहे.
नुसत्या नर्मदामैयेच्या दर्शनाने, स्नानाने मोक्ष मिळतो म्हणतात, ह्या तुलनेत गंगेत स्नानाने पाप धुतले जातात अशी मान्यता आहे. फक्त गया अलाहाबादला म्रृत्यु आल्यास direct मोक्ष मिळतो. हा जरा श्रध्दा,वा अंधश्रद्धेचा भाग म्हणून सोडला तरी मोक्षप्राप्ती साठी सगळे चराचर प्राणी काशीत स्थायिक होऊन निश्चितच राहु शकत नाहीत. गंगेला आधुनिक इतिहास आहे, परंतु नर्मदेला अनादी,अनंत कालखंड लोटला आहे.५० कोटी वर्षांपूर्वी नर्मदा असल्याचे प्रमाण पुरातत्व विभागाला अमरकंटक च्या जवळ “घुघवा “ येथे मिळालेले आहेत.ऐतिहासिक संदर्भांनुसार नर्मदेची प्रथम परिक्रमा मार्तंड ऋषिंनी १०,००० वर्षांपूर्वी केली. ती करायला त्यांना ४५ वर्षे लागली.त्यांनी नर्मदेला मिळणार्या उपनद्यांना सुध्दा क्राॅस न करता, क्रमश: त्यांच्या उगमापाशी जाऊन तिथून पैलतिरावर जाऊन परत त्यांच्या काठावरून परत नर्मदेतिरी येऊन परिक्रमा यथावत जारी ठेवत ,पुर्णत्वाला नेली. आज त्याची कल्पना पण करू शकत नाही कारण मानवाचे आयुर्मान च ६०-७० वर्षांचे असते.ऋषिवर हजारो वर्षे जगायचे ! ह्या सर्व घटनांचा उल्लेख “ नर्मदा पुराण” या ग्रंथात मिळतो.हिंदु धर्मात वेद,उप निषद,स्कंद,पुराण यांचे विशेष महत्व आहे व ते सर्वविदीत आहे.जगांत कुठल्याच नदीला इतका जुना इतिहास नाही,व कुठल्याच नदीचे पुराण अस्तित्वात नाही.नर्मदा पुराणांत परिक्रमा कोणी,कशी करावी,त्यासाठीचे नियम,आदी वर्णित आहे.सामान्यत:परिक्रमेला ३ वर्ष , ३ म.१३ दिवस लागावेत(१३ महिने १३ दिवस),परंतु ते सर्वांना शक्य नसते,परंतु यथाशक्ती,यथासमय संभवामी येनकेन प्रकारेण करायला हरकत नसावी.सर्वांनाच सर्व नियम पाळणे जमत नाही व शक्य पण नाही,तरी जसे जमेल तशी परिक्रमा करावी.पुर्णत: अध्यात्मिक नाही तरी निसर्गा च्या सानिध्यांत जाण्याचा एक सुंदर अनुभव निश्चितच घेण्यासारखा आहे.त्याच भावनेतून माझी तथाकथित वाहनादी परिक्रमा “यशोधन ट्रायव्हल”च्या सहकार्याने बसने पार पडली.समुद्रमार्गे न जाता पुर्णता बसने केल्याने पुण्य वगैरे मिळाले नसणार व मला त्याची अपेक्षा नव्हतीच ! माझ्या वैज्ञानिक,भौगोलिक,सामाजिक ,ऐतिहासीक जिज्ञासेची मात्र परिपुर्णता झाली. मी नख न काढणे,दाढी न करणे,रोज नर्मदेवरच स्नान करणे इ.नियम पालन केले नाही पण आनंद पुर्ण घेतला.घाटांवरील पाण्याची शुध्दता निश्चितच विश्वसार्ह नाही.आपणच तिला पान,फुल प्रसाद कचरा टाकून अशुध्द करतो.पाण्याला प्रवाहीत न ठेवतां आपणच तिला एका डबक्याचे रूप देतो.मग शुध्दतेची अपेक्षा कशी करायची?
आसक्तिपुर्ण वातावरण :
नर्मदा आपल्या जोरदार प्रवाहा मुळे वाटेत येणार्या खडक,दगड यांचे रव्यासारखे बारीक रेतीत रूपांतर करते म्हणुन तिला “रेवा” असेही म्हणतात.नर्मदेची लांबी साधारण पणे २४०० कि मी आहे व परिक्रमा ४८०० कि मी ची होते.कितीही घाईने पण कष्टप्रद न होता रात्री मुक्काम करत गेलो तरी १८-२० दि सहज लागतात .सलग इतके दिवस घराबाहेर राहणे प्रापंचिक माणसाला शक्य होत नाही,म्हणुन च साधारण प्रपंचातुन निवृत्त झाल्यावर परिक्रमेचा विचार डोक्यात येतो व ते शक्य होते.एव्हाना शारिरीक द्रृष्ट्या मनुष्य दुर्बल,व्याधिग्रस्त झाला असतो परंतु उत्कट इच्छाशक्ती च्या जोरावर अर्थातच नर्मदा मैयेच्या क्रृपेनी ती पार पडते असे म्हणायला हरकत नाही.
नर्मदेतिरी गेल्यावर तिथल्या निरव शांत वातावरणात,तिच्या अस्तित्वाची अनुभुती,वेगवेगळ्या अनुभवांच्या रूपात येते म्हणतात.कोणाला सिध्दी प्राप्त होते,कोणाला द्रृंष्टांत येतात,कोणाशी नर्मदा हितगुज करते तर कोणाला विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रेरणा देते असं म्हणतात.पण तिच्या सानिध्यात माणसाला वैराग्य(आसक्ती) येते की साधारण वैराग्य आल्यावर माणसाला परिक्रमेची बुध्दी होते ,हे विचार करण्याला भाग पाडते.पौराणीक इतिहासानुसार,नर्मदेच्या काठावर अनेक ऋषिमुनीं,साधु, संत यांनी ध्यान धारणा,तपश्च्यर्या करुन ,नामस्मरण करुन संजिवन समाधी घेण्यापर्यंत घटना घडलेल्या आहेत.बहुतेक जण सदगुरू च्या शोधात आले,किंवा त्यांच्या गुरूने त्यांना थेट काशीहुन वा त्रिंबक किंवा तत्सम गांडगापुर,क्षेत्रांहुन विशिष्ट कार्य सिध्दीसाठी इथे पाठवले व ते इथेच रममाण झाले.नर्मदेची उत्पत्ती शंकर(शीव) म्हणजे “हर” यांचे विषप्राशनाच्या नंतर आलेल्या घामातुन झाली म्हणुन तिला शंकरांची मानस कन्या मानतात.म्हणुनच तिच्या नावांबरोबर तिच्या वडिलांचे (हर )चे नांव ,अर्थात “नर्मदे हर “म्हणुन प्रचलीत आहे.याउलट स्वर्गीय गंगेला “हरा “ने आपल्या मस्तकावर धारण केल्याने तिच्या नांवाचा उल्लेख “हर हर गंगा “ असा करतात.तप करण्यासाठी आवश्यक शांतता मानवाला एकतर हिमालयावर किंवा नर्मदा तिरी च आढळली.तशा पोराणीक आख्यायिका अनेक आहेत व त्या ओघाने येतीलच.
— सतीश परांजपे
( क्रमशः )
Leave a Reply