परिक्रमेची मुळ भावना वैराग्य, संसारापासुन अलिप्त होणे, इश्वर प्राप्तीसाठीचा शोध, प्रयत्न, असावा किंबहुना असायला हवा. मी कोण? माझे काय?आत्मा काय? मोक्ष काय? माझे जगात येण्याचे प्रयोजन काय?
ह्या व असल्या अनेकानेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच, ब्रम्हांडाचा शोध, स्वत:तला मी नष्ट करणे इत्यादी महान कार्यांसाठीच संत-महात्मे परिक्रमेसाठी आलेत,
शोध लागला असेल, नसेल तो भाग वेगळा. केवळ आपले नांव व्हावे, देवळ बांधुन पुण्य कमवावे, किंवा जीवनात हताश झाले तर आत्महत्येपेक्षा समाधी घ्यावी असा उद्देश निश्चितच नसणार. दिवस ,महिने यांच्या पलिकडे ते होते.आपल्या जीवनाची दोरी च त्यांनी देवाकडे गहाण ठेवली असणार अन्यथा हे सारे शक्य नाही. व ते सामान्यांचे काम नाही. आपल्या हातुन दोन फुटक्या कवड्या सुटत नाही,मोह सुटत नाही तर समाजासाठी काय करणार ?
आजच्या संदर्भात परिक्रमेचा उद्देश जग पहाव म्हणण्यापेक्षा (युरोप,अमेरिका तर सगळेच पहातात) निसर्गा जवळ जाव, आपल्यापेक्षा गरीब, वंचीत उपेक्षित वर्ग पहावा व शक्य झालं तर त्यांचे साठी “काहीतरी द्याव “ नव्हे तर “करावे”हा असायला हवा. हे जर आपण त्यांच्यात गेलो, मिसळलो तरच शक्य आहे, म्हणुन “पायी परिक्रमेची”महती! शरिराला क्लेश कष्ट तर होतातच पण “कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है “असे आहे.
मुळ मुद्दा –
बरोबर काही ठेवायचे नाही, म्हणजे संग्रह करायचा नाही. उद्या ची चिंता करायची नाही, आज आहे त्यांत समाधान मानायचे, उन्ह थंडी पावसाने विचलित व्हायचे नाही, कोणाला काही मागायचे नाही, मिळाले तर नाही म्हणायच नाही, सदावर्त ठेवायचे म्हणजे दोन घरी भिक्षा मागायची, जे मिळेल ते खायचे, कुणाच्या घरी पाहुणचार घ्यायचा नाही, आश्रम, मंदिर, पडोसरीत निवास करायचा, पहाटे उठुन मैयाचे दर्शन, स्नान व पुढे रवानगी, दुपारी विश्राम, संध्याकाळी पर चालायचे व रात्रीला मुक्काम. सन्यासी बनण्याहुन हे काय कमी आहे? थोडक्यात पुर्वी जसे “भटकळ”लोक असायचे(nomadic) तसे राहायचे. शिक्षणामुळे ,आधुनिकतेमुळे आपण तब्येतीचा जास्त बाऊ करतो.पण पुर्वी लोक कुठे करायचे? ज्ञानामुळे विचार, ताणतणाव, धावपळ व त्यामुळे येणारे “अस्वस्थ ता,रोग”.येतात म्हणा किंवा त्यांची जाणीव होते व तसे झाल्यावर आपण पाय मागेच घेतो. अज्ञानात सुख असते म्हणतात ते ह्यामुळे च. दुसर्या भाषेत ,देवा वर किंवा मैये वर पुर्णत: भिस्त ठेवायची.
वरील मुद्दा अर्थात “विवादीत” आहे,चुक की बरोबर हा ज्यांचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ! पण असे करुन पण लोक राहिले आहे,राहातात आहे हे निर्विवाद .
व्यवहारिकता : माझ्या परिक्रमेचा तर्क
स्वत:बद्दल बोलायचे झाले तर that is not a cup of my tea. मी दुसर्याच्या भरवशावर uncertain conditions वर असे राहु शकत नाही. knee replacement, bye pass, cataract operations झाल्यावर ह्या वयात पायी परिक्रमा शक्यच नाही.बस नी जाण्याचा पर्याय म्हणुन ,थोडी रिस्क घेउन, मी जायचे ठरवले.ह्या वयांत ठरावीक जागा,ठरावीक रुटीनच बरे वाटते.त्यातुन बर्यापैकी चालणे,रोज खुप पायर्या चढउतार,खाण्यापिण्याच्या अवेळा,झोप रोज वेगवेगळ्या ठिकाणी उशिरा ११.३०-१२ पर्यंत ,उठायचे कधी ४ तर कधी ५.तर काय -अनियमित वेळा ,त्यामुळे first aid/stand by औषधांचा संच घेउन परिभ्रमणाला गेलो.परिभ्रमण म्हटले कारण समुद्रातुन पैलतिरावर न गेल्याने “परिक्रमा नाही”. नावेंत ४-५ तासांचा प्रवास :पण washroom ची सोय नाही(मी प्रोस्टेट चा पेशंट),रात्री २ ते पहाटे ६ पर्यंतचा वेळ बोटीतव कैटेरैक्ट मुळे खुप अंधारात व खुप उजेडांत निट दिसत नाही,चढा उतरायचे व चालायचे चिखला त तेही १-२ कि मी. बसायला पाट्या,security शुन्य म्हणजे गव्ह.तर्फे काहीच व्यवस्था नाही ,बोटींवर कोणाचेच नियंत्रण नाही ,नेव्हीगेशन ची काही च उपकरणे /व्यवस्था नाही.
(राजनितीक इच्छाशक्ती च्या अभावी काही आशा पण नाही.)अशात २-३ कि मी समुद्रात आंत जाऊन २०-२१ कि मी चा यु टर्न घेऊन नावेंचा प्रवास म्हणजे हवेत तीर मारण्या सारखेच झाले.सौ नी मात्र हे दिव्य पार पाडण्या चे ठरवले .”God helps those who help themselves “ही उक्ती आता ,बहुदा “God helps those who blindly keep faith in Him”अशी झाली असावी. !
परिक्रमा विविध पर्याय
भटकंती, ट्रेकिंग नाही तर निदान निसर्गाशी नाते जोडणे या संकल्पनेतुन कां होईना,परिक्रमा एकदा तरी करावी हे निश्चित. मग ती कशी करावी हे ज्याचे त्याचे, त्यानी ठरवावे. सामान्य बुध्दी प्रमाणे परिक्रमा म्हणजे उगम(अमरकंटक) ते समुद्रात विलीनीकरणाच्या स्थाना पर्यंत दक्षिण तटाने, घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने (म्हणजे देवाप्रमाणे नर्मदेला उजव्या हाताला ठेऊन ) जाऊन उत्तर तटाने परत येणे.अमरकंटकला नर्मदेचे मुख तर विमलेश्वर (अंकलेश्वर) ला तिची पावलं आहेत व ओंकारेश्वर (पैलतिरावर नेमावर) ला नाभिस्थान, अशी मान्यता आहे. परंतु ओंकारेश्वराच्या पौराणिक माहात्म्यामुळे ,परिक्रमा तिथुन सुरू करण्या ची प्रथा पडली असावी .
या संबंधात पौराणीक कथा खालील प्रमाणे सांगतात
अत्यंत तल्लख बुध्दीचे ,योगिक शक्तीचे आदि शंकराचार्य ८-९ वर्षाचे असताना गुरू च्या शोधात ओंकारेश्वरला आले.जिथे त्यांना पु गोविंदाचार्य भेटले.त्यांना गुरुत्व स्विकारण्याचा त्यांनी आग्रह केला.गोविंदाचार्यांनी त्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले व त्याच्या जिभेवर एक खडिसाखरेचा खडा ठेवला व तो मी संध्याकाळी मी तो जसाच्या तसा घेईन म्हणाले.संध्याकाळी त्यांनी खडा वापस मागितला .शंकराचार्यांनी पण “आ” करुन तो पुर्ण च्या पुर्ण दिला,एवढी त्यांची अवयवांवर नियंत्रण ठेवण्याची यौगिक शक्ती होती.गोविंदाचार्य प्रसन्न झाले व त्यांना दिक्षा दिली.पुढे एकदा गुरूवर ध्यानस्थ बसले व शंकराचार्यांना सांगितले की माझी साधना पुर्ण होइतो कोणाला आंत सोडु नकोस.शंकराचार्य त्यांचा आदेश तंतोतंत पालन करत बसले.साधना पुर्ण व्हायच्या आंत नर्मदा गोविंदाचार्यांना भेटायला आली,पण शंकराचार्य तिला भेटु देईना.नर्मदा ऐकायला तयार होईना तेंव्हा शंकराचार्यांनी नर्मदेला एका कमंडलूत बंदिस्त करून टाकले.जेंव्हा गुरूवरांनी विचारले की कोणी भेटायला आले तर नाही? तेंव्हा त्यांना पुर्ण बातमी कळली.ते म्हणाले “नर्मदा फार चंचल आहे, तिला लगेच मोकळे कर.मग शंकराचार्यांनी कमंडलु रिता केला ,तेंव्हा पासुन ती तिथे ॐच्या आकारात प्रवाहित होऊ लागली,व या क्षेत्राला तिर्थक्षेत्राचे महत्व आले.
१ . मुळत: हा ओंकारेश्वरलाच, ७-८ कि मी ची मांधाता पर्वता निकट,कावेरी,नर्मदा यांच्या संगमामुळे ॐ च्या आकाराच्या तयार झालेल्या बेटाला विविध मंदिरांच्या दर्शनाने केलेली लोकल परिक्रमा, शिव महात्त्म्यामुळे पौराणीक महत्वाची असावी.
नंतर बहुदा मार्कंडेय ऋषिंनी केल्यामुळे, बहुमान्यतेची वर्तमान प्रचलित तीन वर्षे तीन महिने तीन दिवसांची. विवीध अटींच्या शिथीलतेने, वेळेचे निश्चीत बंधन पण मुक्त करून, क्षमतेनुसार यथाशक्ती तेरा महिने, १०८ दिवस असे, नंतर जमतच नसल्यास स्व वाहनाने, मग बसने अशी मान्यता बनत गेली
एकपरिक्रमा, महत्वाच्या दोन तिर्थक्षेत्रां मंधे “गरूडेश्वर ते नारेश्वर “व परत अशी ७-८ दिवसांची पण मान्यता पावत आहे. सिध्दीप्राप्त प पू टेंभे स्वामी व पु .रंगावधुत स्वामी ह्या गुरु शिष्य जोडीमुळे असेल कदाचित. जर अशी शिथिलता मान्य आहे तर सोईनुसार टप्या टप्या नी परिक्रमा करायला काय हरकत?
उदा: ओंकारेश्वर ते समुद्र मार्गे किंवा अन्यथा पैलतिरावर जाऊन तथाकथित नाभीस्थान नेमावर,नारेश्वर करून परत ओंकारेश्वर. नंतर यथासमय यथाशक्ती पुन्हा ओंकारेश्वर हुन मांडवगड करत जबलपुर,अमरकंटक ,तटपरिवर्तन करून होशंगाबाद मार्गे ओंकारेश्वर अशी.
परिक्रमा करताना, काही अपरिहार्य कारणांमुळे, जर बाधा आली तर “मुर्ती”(परिक्रमावासियांना मुर्ती असे संबोधतात.) उरलेली परिक्रमा बाधीत स्थानापासुन पुन्हा करेलच. त्यामुळे परिक्रमा सोईनुसार करता येऊ शकते. हा सगळा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा विषय आहे. त्यांत पाप,पुण्याचा प्रश्न येतोच कुठे?
— सतीश परांंजपे
Leave a Reply