नवीन लेखन...

ओला कोप

गेल्या दोन दिवसान पासून सूर्य दर्शन नाही. बाहेर पावसाची रिप रिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पाऊसाची झड लागली कि मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेवून, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा अल्ल्हाद एन्जोय करतोय.
काळ्या – निळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, त्या पावसाच्या रेशमी सरी, कॉफी आणि हेडफोन मधून एकू येणार ‘ रिमझिम के तराने लेके आई बरसात ‘ हे गाण!(रफी + गीतादत्त ), या क्षणा साठी मी स्वर्गसुख सुद्धा लाथाडीन!. पावसा पेक्षा पावसावरची गाणीच ज्यास्त असतील. पण या गाण्यात मी गुतलोय. मला ते खूप आवडत. कारण मलाही कोणाची तरी ‘ पहिली मुलाकात ‘ याद येत.

त्या दिवशी आमचा दहावीच्या वर्गाचा एक्सट्रा क्लास होता. संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली. क्लास संपायला सहा वाजले. पाऊस पडून गेला होता, पण रिमझिम चालूच होती. आभाळहि निवळले नव्हते.मी शाळेच्या बाहेर आडोश्याला उभा राहून, पाऊस थांबण्याची वाट पहात होतो. (आत्ता सारखे ढग आले कि छत्री घेऊन शाळेत येणारे माय – बाप तेव्हा नव्हते. कार्ट, चट घरी येणार याची खात्री असणाऱ्या बेफिकिर जन्मदात्यांच्या तो सुवर्ण काळ होता!)
“सुऱ्या, चल येतोस?माझ्या छत्रीत. पाऊस थांबेलस नाही वाटत. रात्रीचा पाहुणा दिसतोय.” आमच्या घरा शेजारची उषा केव्हा आली कळलेच नाही. माझ्याच वर्गातली पण दुसऱ्या शाळेत जायची. मी जरा घुटमळलो. कारण त्या काळी आम्ही मुलं मुलीनं पासून जरा लांबच राहायचो. पाऊस तसा फार जोरात नव्हता. मला भिजण्याची काळजी नव्हती. पण सोबतची वह्या – पुस्तक भिजली असती ना? म्हणून मग मी तिच्या चीटूरन्या छत्रीत डोकं घातलं.
कसचं काय? एरवी ती एकटी न भिजता त्या छत्रीतून घरा पर्यंत आरामात गेली असती. पण त्या छत्रीन आम्हा दोघांना हि ओलचिंब केलं!

घरी गेल्यावर मी ओले कपडे बदलून कोरडे घातले. आईने ‘मेल इतकं भिजायची काही गरज होती काय?सर्दी झाली म्हणजे?’ असलं काहीतरी म्हणत, आग माग ‘मेल्या, मुडद्या’ लावत खासाखासा डोकं पुसूनकोरड केलं. आमच्या घरात कांदा – लसूण -वांग हे पदार्थ चातुर्मासात वर्ज असतात. पण कॉफी मात्र वर्ष भर बंद! का? माहित नाही. पण त्या दिवशी आईने गरमागरम कॉफी करून दिली. पाहुण्यांना म्हणून आई कॉफीची एखादी वडी घरात ठेवत असे. आज चहा समपला होतो म्हणून कॉफी.

माझे काही तर हरवले आहे. उषा आसपास जवळच आहे. ‘ येतोस, माझ्या छत्रीत!’ म्हणतीय अस वाटत होत. अजून पावसात भिजावं वाटत होत. तिची छत्रीत असतानाची उब पुन्हा पुन्हा आठवत होती. अंगावर गोड काटा येत होता! थोडस अधांतरी तरंगल्या सारखं वाटत होत. का? आज जरी या ‘ का?’ च उत्तर माहित असलं तरी, तेव्हाच ‘ वाटण ‘ वेगळंच होत.मी माझ्या अभ्यासाच्या खोलीची खिडकी उघडली. खिडकीच्या ओट्यावर, आईने दिलेला बिनकानाचा कॉफीचा कप (मी त्याला तेव्हा मग म्हणायचो )ठेवला. खरखऱ्या ट्रान्झिस्टर लावला तर त्यावर हि पावसाचीच गाणी लागलेली होती. ‘ रिमझिम के तरांने लेके आई बरसात —‘ तो रेडिओ हि मी खिडकीच्या ओटयावर ठेवला. खिडकीच्या बाहेर पहिले तो पावसाच्या सरी लयीत ,रेशमी धाग्या सारख्या बरसत होत्या, आणि —-आणि चार घरे सोडून असलेल्या, घराच्या गच्ची वर उषा दोन्ही हात पसरून स्वतः भोवती गोल गोल फिरत, बेभान होवून नाचत होती! ओलीचिंब! मला जे वाटत होते, नेमके ती, तेच करत होती!

त्या दिवशी माझे भिजलेले अंग, कपडे, डोक, कोरड झालाय. पण सगळ नसलं तरी मनाचा, एक कोपरा अजून ओलाच आहे! तो क्षण, तोच मी, तीच उषा परत येणार नाही. मला माहित आहे. तरी ओला जीव कोठेतरी गुंतलाच आहे!

“अहो, काय मेल त्या पावसाच्या रिपरिपीत टक लावून पहातंय?हातातल्या कॉफीचा कोकाकोला झालाय! बंद करा ती खिडकी. गार वार झोंबतय!”
बायकोने नेहमी प्रमाणे माझ्या ओल्या विश्वातून कोरड्या जगात खेचून आणले.

—  सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय.पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

1 Comment on ओला कोप

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..