मूत्रपिंडांच्या धमन्यांत थर साचल्यास मूत्रपिंडाचे कार्य मंदावते. धमनीचित्रण करून स्टेण्ट टाकल्यावर (रक्तप्रवाह सुरळीत होऊन कार्य पूर्ववत चालू होते. मूत्रपिंडे बिघडल्यास अपोहन (डायलिसीस) व शेवटी प्रतिरोपणाचा पर्याय असतो. शरीरातील स्नायू ताठरतात व हालचालींचा वेग मंदावतो.
सांधेपण आखडतात व दुखतात. व्यायामाने स्नायू व सांधे सुटतात म्हणून व्यायाम महत्त्वाचा. जवळचे बघायला चाळीशीनंतर त्रास होतो. चष्म्याने दृष्टी सुधारते; पण तो सतत लावावा. ग्लॉकोमा (डोळ्यातील द्रवदाब वाढणे) व मोतीबिंदू हजेरी लावतात. ग्लॉकोमावर औषधयोजना व शस्त्रक्रिया होऊ शकते. मोतीबिंदूवरही नवीन पद्धतीने शस्त्रक्रिया करून डोळ्यात कृत्रिम भिंग टाकून दृष्टी पूर्ववत होते. प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ अपेक्षित असते. सुरुवातीस लघवीस त्रास होतो. नंतर अडथळा येतो. शस्त्रक्रियेने तो भाग काढता येतो. प्रॉस्टेटच्या कर्करोगावरही रोबोटिक शस्त्रक्रियेने उपाय चांगला होतो. दर तासाला एक ग्लास पाणी प्यावे व लघवी स्वच्छ आहे का ते बघावे म्हणजे जंतूसंसर्ग टाळता येतो. फुप्फुसे, श्वासनलिका यातील स्नायूंची व पेशींची लवचिकता कमी होते. फासळ्यांच्या पुढील टोकांच्या कास्थीत कॅल्शियम साठून लवचिकता कमी होते. छातीचे स्नायू ‘ताठरतात. परिणामी श्वास घ्यायला त्रास पडतो.
श्वासोच्छ्वासाचे व्यायाम केल्यास हा त्रास कमी होतो. दातांची – निगा तरुणपणापासूनच राखावी म्हणजे खूप रोग लांब ठेवता येतात. वार्धक्यात दाताची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. खराब दातामुळे ऑपरेशननंतर जखम पिकण्याची शक्यता वाढते.
वार्धक्य लांबवायचे असल्यास व निरोगी हवे असल्यास आहार महत्त्वाचा आहे. क्रियाशीलतेनुसार १५०० ते १८०० कॅलरीजचा समतोल आहार दिवसाच्या ४ भागांत विभागून घ्यावा. पालेभाज्या व तंतूमय पदार्थ जास्त खावित म्हणजे बद्धकोष्ठता होत नाही, तसेचं पाणीही प्रमाणात प्यावे. कमी झाल्यास बद्धकोष्ठता होते. सतत होणारे अपचन, मलमूत्राच्या सवयीतील
बदल, उपचाराने बरी न होणारी बद्धकोष्ठता, शौच्यातून जाणारे रक्त इ. तक्रारी, सतत होणारा खोकला, घोगरा आवाज, गिळताना होणारा सतत त्रास, असे झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. कर्करोगाची नेमराठी विज्ञान परिषद शंका काढून टाकावी. मधुमेहाला योग्य आहार, व्यायाम, मानसिक संतुलन व औषध योजना यांनी नियंत्रित ठेवावे. वार्धक्यात जगायला साहाय्य करते आनंदी वृत्ती आणि जीवनेच्छा. जीवनेच्छा जीवनरेखा लांबविते. नियमित घेतलेला संतुलित आहार, सातत्याने केलेला व्यायाम, व प्रयत्नपूर्वक जपलेले मानसिक संतुलन वार्धक्य आनंदमयी करते.
– डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply