मुंबईत लागोपाठ दोन चित्रपट पुरस्कार पार पडले. ‘मामि’ पुरस्कारात आंतरराष्ट्रीय पातळीव ताज्या चित्रपट प्रवाहांचे दर्शन घडले. तर आशियाई चित्रपट पुरस्कारात आशिया खंडातील चित्रपट वैविध्याने स्तिमित केले. ‘मामि’मध्ये हॉलीवूडमधील ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक-लेखक ऑलिव्हर स्टोन यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले तर आशियाई चित्रपट पुरस्कार अर्थात ‘थर्ड आय’मध्ये श्याम बेनेगल यांचा सन्मान करण्यात आला. स्टोन आणि बेनेगल यांचा काळ साधारणतः एकच आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात बेनेगलांनी समांतर चित्रपटांच्या चळवळीला भक्कम आधार दिला, त्याच काळात ऑलिव्हर स्टोन यांनी हॉलीवूडमधील मुख्य प्रवाहातच घुसखोरी करून ‘मेन स्ट्रीम’मध्येच संवेदनशील चित्रपट दिले. एक प्रकारे भारतीय व अमेरिकन चित्रपटसृष्टीतील विचारसरणीमधील फरकच यातून स्पष्ट होतो. न्यूयॉर्कमध्येच १५ सप्टेंबर १९४६ रोजी जन्मलेल्या ऑलिव्हर स्टोनने ‘हॉलीवूड’मध्ये राहूनही चित्रपटांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन स्वीकारला नाही. तीन ऑस्कर पुरस्कार मिळविताना त्याने स्वतःची राजकीय मतेही त्यात ठोसपणे मांडली.
व्हिएतनाम युद्धात स्वतः भाग घेतलेल्या स्टोनने या युद्धाच्या वेगवेगळ्या पैलूंवर तीन चित्रपट बनविले. त्यातील ‘प्लॅटून’ या त्याच्या पहिल्याच आत्मचरित्रात्मक चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. पाठोपाठ त्याने ‘बॉर्न ऑन द फोर्थ जुलै’ हा चित्रपट दिला. ‘हेवन ॲण्ड अर्थ’ मध्येही व्हिएतनाम युद्धातील ससेहोलपटीचे चित्रण होते.
फ्रान्स, अमेरिकन सैन्याशी लढतानाच अनेकांना व्हिएतनामी लष्कराच्या अत्याचाराचाही सामना करावा लागला होता. ‘हेवन ॲण्ड अर्थ’मध्ये स्टोनने अशाच एका तरूणीची व्यथा चितारली होती. युद्धाचे चित्रण करताना त्याने अनेकदा वास्तववादी, ‘डॉक्युमेण्ट्री स्टाइल’ स्वीकारण्याचे धाडस केले. त्यामुळे व्हिएतनाम युद्धावरील त्याचे चित्रपट
पाहताना, अनेकदा प्रत्यक्ष युद्धाचेच ‘खरेखुरे फुटेज’ पाहतो आहोत, असे वाटते. शोधपत्रकारितेची शैली आणि वृत्ती स्टोनच्या चित्रपटांमध्ये ‘जेएफके’च्या वेळीही याचा प्रत्यय आला. जॉन एफ. केनेडी यांच्या दिसते. हत्येपूर्वी घडलेल्या घटनांचा, हत्येच्या योजनाबद्ध तयारीचा मागोवा स्टोनने या चित्रपटात घेतला होता. हा चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण केला गेला. परंतु ही सर्व टीका मागे सारून चित्रपटाने मोठे यश मिळविले आणि पटकथालेखनाची एक वेगळी शैली स्थापित केली; परंतु ‘डॉक्युमेण्ट्री स्टाइल’ चे वैशिष्ट्य मात्र यातही कायम राखले होते. यातून बाहेर पडून त्यांनी प्रयत्न केला तो ‘वॉल स्ट्रीट’मध्ये. ‘ग्रेट डिप्रेशन’ अर्थात अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या काळातील एका तरूण शेअर दलालाची कथा हा चित्रपट सांगतो. यशासाठी आसुसलेला हा तरूण त्याचा आदर्श असलेल्या गॉर्डन गेक्कोकडे जातो. त्यानंतर
या दोघांमधील संबंध आणि शेअर बाजारातील विविध प्रवृत्ती यातून चित्रपट घडतो. ऑलिव्हर स्टोनने हा चित्रपट आपल्या वडिलांची व्यक्तिरेखा समोर ठेवून केला होता, असे म्हणतात. ‘ग्रीड, फॉर लॉक ऑफ अ बेटर वर्ड इज गुड’ असं म्हणणाऱ्या मायकेल डग्लस या त्याच्या व्यक्तिरेखेकडून स्फूर्ती घेऊन अनेक तरुण शेअर मार्केटकडे वळले. ‘वॉल स्ट्रीट’चा दुसरा भाग ‘वॉल स्ट्रीट-मनी नेव्हर स्लिप्स’ अलीकडेच प्रदर्शित झाला. चार दशकांच्या कारकीर्दीत स्टोनने लेखक-दिग्दर्शक म्हणून वैविध्यपूर्ण कामगिरी केली आहे. ‘कॉनन द बार्बरियन’ सारखा एरवी त्याच्या प्रकृतीचा न वाटणारा चित्रपटही त्याने समर्थरीत्या लिहिला होता. या सर्व काळात वाद, वादंग सतत त्याचा किंवा तो स्वतःच त्यांचा पिच्छा पुरवित राहिले. ‘दुसऱ्या महायुद्धात ज्यूंच्या झालेल्या हत्याकांडावर खूप चित्रपट आले, कारण अमेरिकेत ज्यूंची लॉबी आहे’, ‘असे विधान स्टोनने केले, त्यामुळे गदारोळ उठला. अखेर स्टोनने दिलगिरी व्यक्त केली. अशा अनेक वादांचा सामना करीत, वैयक्तिक आयुष्यातील वादळे झेलत स्टोनने दिग्दर्शक म्हणून केलेली कामगिरी अजोड आहे.
Leave a Reply