आोम पुरी नावाच्या खटमलचा समाचार घेणारा हर्षद बर्वे यंचा हा लेख. खरंच अशा माणसांवर बहिष्कारच टाकायला पाहिजे. दोनचार सिनेमे चालले की यांच्या डोक्यात जातात..आणि मग कोणत्याही विषयावर बोलायला लागतात… मुळात चॅनेलवाले अशा लोकांना बोलावतातच का तेच कळत नाही. की तेसुद्धा TRP साठी आसूसलले भोंदूबाबाच ?
टाइम्स नाऊ वर अर्णव गोस्वामी डिबेट करत असतांना ज्या पद्धतीनेे ओम पुरी हा कर्नल थापर साहेबांशी बोलत होता ते बघून तळपायाची आज मस्तकात गेली. साला खटमल पण नाही हा आणि कर्नल थापर साहेबांना वाट्टेल त्या भाषेत बोलायला याला खरंच काहीच कसे वाटत नाही याचेच मला प्रचंड आश्चर्य वाटले. संताप आणि तिडीक गेली डोक्यात. याला बहुदा माहीत नसावं कर्नल थापर कोण आहेत. ३७ वर्ष आयुष्याची थापर साहेबांनी या देशाच्या आर्मीला, म्हणजेच आम्हाला दिली आहेत. माझे वय ४२ आहे आणि मी अजूनही सुरक्षित आहे यात कर्नल थापर साहेबांचा किती मोठा वाटा आहे हे ओम पुरीला नक्कीच कळणार नाही पण मला मात्र नक्कीच कळते. याच कर्नल थापर साहेबांनी आपला अवघा २२ वर्षाचा मुलगा दिला आहे या देशासाठी कारगिल युध्दात. पिक ४७०० घेतांना कॅप्टन विजयंत थापर हुतात्मे झाले होते हे हा हरामखोर ओम पुरी जरी विसरला तरी मी नाही विसरू शकत. ज्या वयात मी नेमके काय करायचे याचा विचार करत होतो तेंव्हा कॅप्टन विजयंत थापर हुतात्मे झाले. आपल्या वडलांना लिहिलेल्या पत्रात हा अवघा २२ वर्षांचा शूरवीर म्हणाला होता, ‘I have no regrets. In fact, even if I become a human again, I will join the army and fight for the nation.’
इथे संध्याकाळची दारू मिळेल कि नाही याची चिंता करणाऱ्या या लोकांना हे नाही कळायचे. अवघ्या २२ व्या वर्षी “I have no regrets” म्हणणे हे डेमी गॉड पेक्षा कमी नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ओम पुरी हे वाचणार नाही हे पण मी माझा मागच्या वर्षाचा अनुभव परत इथे शेयर करतो आहे. पंगोंग त्सेला जातांना आर्मीची चेकपोस्ट आहे.
-फोटो आयडी दिखाओ और ग्रुप लीडर को भेजो
-सर, मै हू ग्रुप लीडर और यह सब के आयडी
-बर्वे, महाराष्ट्र से हो
-यस सर
-कहासे हो जनाब
-सर, औरंगाबादसे
-कुटल्या एरियात राहतो वो
-देवा, गारखेडा
मग त्या सैनिक मित्रानी मारलेली घट्ट मिठी आणि दोघांच्याही डोळ्यातून घळघळ वाहणारे पाणी. पाच महिने झाले होते त्याला लदाख मध्ये पोस्ट होवून. दोन मुले, बायको आणि अख्ख घर वाट बघते आहे लदाख पोस्टिंग संपण्याची पण हा गडी ठाम उभा आहे.
-अहो बर्वे, आम्हाला कल्पना असते, कदाचित परत घरच्यांना बघता येणार नाही याची, पण कोणाला तरी येथे रक्षणासाठी उभे रहावे लागणार कि नाही ?
आमच्या संपूर्ण ग्रुपनी सलाम ठोकला आर्मीला लदाख मध्ये.
भारता सारख्या सहिष्णू देशात राहण्याची आणि वाट्टेल ते बोलण्याची आझादी कशी मिळते हे बघायचे असेल तर काही दिवस लद्दाख मध्ये सेने बरोबर राहायला हवे. रस्त्याच्या एका बाजूला उंचच उंच हिमालय तर दुसरीकडे डोळे फिरतील अश्या दऱ्या. हाडं गोठवणारी थंडी, हवेत नसलेला प्राणवायू, एक एक पावूल उचलतांना पडणारे कष्ट. अप्रतिम सौंदर्य पण त्याला भीषण निसर्गाची झालर. मागील वर्षी दोनदा जाण्याचा योग आला, चांगले पंधरा दिवस राहून आलो. खडतर आयुष्य काय असते याची कल्पना आली. अश्या परिस्थितीत काही माणस आपल्यासाठी सियाचीनला उभी राहतात. त्यांना पहिले कि डोळ्यात पाणी येतेच. कारगील वॉर मेमोरियल वर न रडणारा माणूस मी तरी बघितला नाही. २२, २३, २५ वर्षाची मुले पण काय अफाट पराक्रम गाजवला आहे. पंगोंग त्सो बघायला अतिशय खास पण तीही रक्तरंजीत इतिहास असलेली युद्धभूमीच आहे.
पंगोंग त्सोला फडकत असलेल्या तिरंग्याकडे बघितले आणि मला वाटले, कि साला आपण कोणाच्या जीवावर इथे गप्पा हाणतो? त्या चीनमध्ये बंदी आहे फेसबुकवर. साधं बोलता येत नाही, तियानमेन चौकात आजही साधी राजकीय कुजबुज देखील करता येत नाही. आपण मात्र भारताच्या घटनेच्या कृपेनी मिळालेल्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा फायदा घेवून टीव्ही चॅनेल्स वर वाट्टेल ते दारू ढोसून बरळतो. कोणाला वाटते की आम्ही थोडी सांगितले होते आर्मीत जा…. तर कोणाला वाटते पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन आले आहेत…. कोणाला कलाकार हवे आहेत तर कोणाला गझल गाणारे .समाजातील सर्व वर्गातली पोर आर्मीत दिसतात, दिसला आहे कधी सिनेमावाल्याचा पोरगा, किमान मला तरी नाही.
दुर्लक्ष करू नका मित्रांनो, अशा व्यक्तीवर बहिष्कार घाला, याची रसद आपण तोडू शकतो, वूई कॅन आयसोलेट देम,
तळटीप :- जे पत्र कॅप्टन विजयंतनी आपल्या वडलांना लिहिले होते, शेवटचं आक्रमण करण्यापूर्वी ते पत्र आणि कॅप्टन विजयंतची स्टोरी वाचून न रडणारा माणूस मी बघितला नाही असे मी म्हणत होतो पण तो समज ओम पुरी नी दूर केला पण ओम पुरी हा माणूस तरी आहे का ?
जय हिंद
जय हिंद कि सेना
— हर्षद शामकांत बर्वे, औरंगाबाद
जास्तीत जास्त शेयर करा, वाट्टेल तसे करा
Leave a Reply