नवीन लेखन...

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने….

|| हरि ॐ ||

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजकारण धुरिणींच्या वैचारिक संदोपसुंदीमुळे देशात नवनवीन नेते व तेव्हढेच पक्ष निमार्ण झाले आणि त्याचे पडसाद श्री.गणेशोत्सवा पासून सर्वच सण व उस्तवावर पडू लागले. जेवढया गल्ल्या-बोळ तेव्हढी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळे व त्यावर राजकारणी मंडळींचा छाप व हस्तक्षेप. लोकमान्य टिळकांनी शंभराहून अधिक वर्षापूर्वी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सार्वजनीक गणेशोत्सवाची स्थापना करून काळानुरूप बहुमोल असे देशबांधणीचे व सर्वांना एकत्र आणण्याचे बहुमोल काम केले याला तोडच नाही. परंतू लो. टिळकांना अभिप्रेत असलेला कार्यकारणभाव सार्वजनीक गणेशोत्सवातून सध्या बघायला मिळत नाही असे सखेद म्हणावेसे वाटते.

पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. परंतू आपण आपल्या दुषकृत्याने निसर्गावर कुरघोडी करतच आहोत व त्याचे परिणाम आपल्याला या ना त्या कारणांनी भोगावेच लागत आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती :-

१) प्रथेनुसार भाद्रपदात साजरा होत असलेला सार्वजनीक गणेशोत्सव माघ महिन्यातील गणेश जन्मापासून साजरा केला जावा.

२) “एक गावा एक सार्वजनीक गणपती” असे गाव पातळीवर तर शहर

पातळीवर पोष्टाच्या पिनकोड प्रमाणे असावेत.

३) मूर्तींच्या उंचीसाठी समन्वय असावा जेणे करून मूर्ती मंडपात आणताना व विसर्जन करतांना काही अडचण येऊ नये.

४) मूर्ती व सजावट इकोफ्रेंडलीच असावी.

५) विसर्जन शक्यतो कृत्रिम तलावात व्हावे.

६) उत्सवात शांतता व शिस्त राखली जावी.

७) सतर्कता व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्वच कार्यकर्त्यांना अनिवार्य करावे.

याचे फायदे पूढील प्रमाणे :-

१) भाद्रपद महिन्यात बरेच शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याने उत्सवात भाग घेऊ शकत नाही ते आनंदाने भाग घेतील. कुटुंबाची हौस मौज करण्यास कनवठीला पिकांचे पैसे असतील.

२) पाऊस नसल्याने मोठमोठाले मांडव घालण्याचा मंडळांचा खर्च कमी होईल.

३) पाणी मुबलक असेल व मुख्य म्हणजे विजेचे भारनियमन नसेल.

४) चालीरीती प्रमाणे घराच्या गणपतींचे पूजन भाद्रपदात झाल्याने इतर सार्वजनीक गणेशोत्सवात भक्तांचा सहभाग वाढेल.

५) पाऊस नसल्याने खड्यांचे रस्ते नसतील.

६) कोरडया हवामानामुळे मुर्तीकारांचा मूर्ती सुखाविण्याचा प्रश्न सुटेल व मूर्तींचे रंग लौकर सुखतील.

७) गणेशाच्या आगमन व विसर्जनकाळी पाऊस नसल्याने भक्तगणांत उत्साह असेल.

८) मंडळांच्या खर्चात बचत होऊन पैसा विधायक कार्यासाठी व गोरगरिबांच्या मदतीसाठी उपयोगात आणता येईल.

वरील सूचनांचा व गोष्टींचा साधक बाधक विचार करून मुंबई व महाराष्ट्रातील सर्व सार्वजनीक गणेशोत्सव मंडळे व समन्वय समितीचे कार्यवाह योग्य तो निर्णय घेतील कारण ही पुढे येणाऱ्या काळाची गरज असणार आहे असे निदान अत्तांच्या घडामोडी वरून वाटते. श्री. विघ्नांचाहर्ता अश्या कुठल्याही अडचणी व प्रसंग त्याच्यावर नितांत दृढ श्रद्धा व प्रेम करणाऱ्या भक्तांवर येऊच देणार नाही याची खात्री आहे. गणपती बाप्पा मोरया ! दर वर्षी लौकर या !

<जगदीश पटवर्धन<वझिरा, बोरिवली (प)

पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती :-

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..