नवीन लेखन...

ऑनलाईन…

” अहो पूर्वा ला आता मोबाइल लागणार आहे , लवकरच काय ती सोय करा ,सध्या ती माझा वापरते आहे .”

” तिला आणि मोबाइल ? , अगं दहावी तरी होउ दे ” मी

” अहो दहावी होण्याची कसली वाट पाहत आहात , आता  तिची मोबाइल वरच शाळा सुरू झाली आहे , तुम्हाला

कल्पना तरी आहे का ?  ”

” मोबाइल वर आणि शाळा ? ” मी आश्चर्याने विचारलं .

” हो online lectures घेतात तिच्या बाई ! ”

” सर्व विषयांची ? ”

” हो मग , तुम्हाला काय वाटलं ,एकाच विषयाची ?  जरा तरी इकडे तिकडे बघत चाला हो ” सौ .चा टोमणा

एका रविवारी सकाळी हे संभाषण होतं काय आणि लगेच संध्याकाळी पूर्वा च्या नावावर एक मोबाइल घरात येतो काय ?

सगळंच अनपेक्षित

” work from home ” हे मी अनेक ठिकाणी वाचलं होतं , पण शाळा सुध्धा ? याची मला खरंच कल्पना नव्हती , कधी मनातही माझ्या आलं नसत . अख्ख्या वर्गा समोर बाईंची बोलणी आणि मार खाऊन आम्ही लहानाचे मोठे झालो .

नुसते मोठे नव्हे तर शिक्षकांनी सुशिक्षित ही बनवलं ! ते शाळेचे दिवस आठवले की मन अस्वस्थ होतं . आज ती दहावीत आहे पण पूर्वा शाळेत  जायला लागल्यापासून पहातोय शिक्षणाची वर्षा वर्षा ला चाललेली अधोगती ! आजही माझ्या शिक्षकांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात , माझ्या समोर आलेच तर झटकन सहजगत्या वाकून त्यांना नमस्कार केला जाईल इतकी कृतज्ञ पणाची भावना त्यांच्या  बद्दल माझ्या मनात आजही आहे .  विद्यार्थ्यांचे सोडा ,पण आजचे शिक्षक ? हो खरं आता ते शिक्षक राहिले नाहीत पगारी  सेवक आहेत , पगार घेतला की .. विषय संपला !त्यामुळे ऑनलाइन काय आणि ऑफलाइन काय त्यांना काहीच फरक पडत नाही !उलट ऑनलाइन खूपच सुखकर . इकडून तिकडून video जमा करायचे आणि द्यायचे मुलांना पाठवून , किती सोप्पं . . त्या रविवार नंतर मी जातीने पाहू लागलो पूर्वा ची ऑनलाइन शाळा . नुसता फार्स  चालू आहे . आणि आज तर काय परीक्षे शिवायच दहावीचा रिझल्ट लागला .  आणि जाणीव झाली की शाळेत जाऊन निदान पढत  मूर्ख तरी जन्माला येत होते आता ते सुध्दा होणार नाही !

आज जगावर विषाणूनचे  संकट आलं आहे , पण ते जेव्हा जाईल तेव्हातरी पूर्ववत शाळा चालू होउ देत हीच आता येणाऱ्या गणपतीच्या चरणी प्रार्थना !

– गणेश वेलणकर

Avatar
About malakans 5 Articles
साधारण 20/ 25 वर्षा पूर्वी मासिकातून , नियतकालिकातून , साहित्य लेखन सध्या facebook ,twitter , whatsapp वरुन वैचारिक लेखमाला वैचारिक चर्चा - अत्यंत आवडता विषय तसेच संगीत साधना , नवीन गाण्यांची निर्मिती food प्रोसेसिंग चे अनेक courses केले .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..