नवीन लेखन...

महिलांना संरक्षण दलात अनेक संधी !

Opportunities for Women in Indian Army

आपला शेजारील देश पाकिस्तान आणि चीन त्यांच्या कुत्सित स्वभाव प्रमाणे आपल्या सीमा वाढविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुपत्या आणि खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. घुसखोरीची एकही संधी जाऊ देत नाहीत. पाकिस्तान तर नेहमीच अतिरिकी घुसवून सीमांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करताना आपण बघतो. चीननेतर अरुणाचल प्रदेश हा आपलाच भूभाग असल्याचे सांगून त्यावर कित्येक वेळा हक्क सांगितला आहे. अश्या सर्व कृरुबुरींवर आपल्या देशाने दोघांना चांगलाच समज दिला आहे. परंतू असे असले तरी आपल्या सीमांचे रक्षण करणे देशाची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी देशातील सर्व संरक्षण दले नेहमीच सर्वार्थाने सुसज्ज आणि समर्थ असणे आपले कर्तव्यच आहे. स्त्रिया जश्या इतर क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने इतर क्षेत्रात पुढे असतात तश्याच देशाच्या तीनीही संरक्षण दलात हिरीरीने भाग घेताना दिसणे हे देश एकसंघ, अखंड आणि स्त्री-पुरुष भेदभाव संपल्याचे द्योतक आहे.

महर्षी कर्वे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, आगरकर अश्या अनेक महान व्यक्तींनी मुलींना प्रार्थमिक आणि उच्च शिक्षण देण्याचा पाया घातला. आज असे कुठलेही क्षेत्र नाही, की तिथे महिला आघाडीवर नाहीत. शिक्षण, संधी, व्यवसाय/नोकरीतील करिअर करण्यासाठी तरुणाई धडपड करताना दिसते पण त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे तितकेसे आकलन होत नाही. समुपदेशनाची गरज आहे.

सध्याचा बऱ्याच पालकांना असे वाटते की आपल्या मुला/मुलीने डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस व्हावे त्यात काहीच अयोग्य नाही. पण त्या व्यतिरिक्त अनेक अश्या संधी आणि वाटा आहेत की ज्या मुला/मुलींचे भविष्य घडवू शकतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात कर्तुत्व दाखविण्याच्या बऱ्याच संधी उपलब्ध होतात. यासाठी देशाच्या संरक्षण विभागात अश्या नोकऱ्या किंवा शैक्षणिक संधी आहेत. त्यांचे वेतनही कॉर्पोरेट जगताशी काही प्रमाणत मिळते जुळते आहे. त्यांना मिळणारे इतर सवलती कदाचित कॉर्पोरेट मध्ये मिळणाऱ्या सवलती पेक्षा खूपच वरचढ आहेत. दुसरा फायदा हा की या निमित्त देश सेवेची संधी मिळून आपल्या मायभूमीचे ऋण फेडण्याची आयती संधी मिळते. इच्छाशक्ती, देशप्रेम, कष्ट करण्याची तयारी, सातत्य देश आणि परमेश्वरावरील दृढ विश्वास याने सर्वकाही शक्य आहे.

आपल्या आर्मी, नेव्ही आणि वायुदलात वाढत्या संख्येने तरुणाई भरती होताना दिसतात. पण त्यात तरुण मुलींचे प्रमाण अत्यल्पच आहे त्याला काही प्रमाणत गैरसमज आणि मार्गदर्शनाचा अभाव असावा.

वाढती बेकारी, नागरी आणि इतर सरकारी सेवेसाठी पुरेशा रोजगार संधीच्या उपलब्धतेच्या अभाव तसेच असुरक्षित खाजगी नोकरीच्या तुलनेत सैन्यात भरती केंव्हाही चांगली. पण सरंक्षण दलात वारंवार बदल्या होतात अशासारख्या असंख्य गैरसमजुतींमुळे तरुण मुली संरक्षण दलात प्रवेश घेण्यास साशंक असतात. त्यांचे पालक त्यांना प्रोत्साहन देताना दिसत नाही. कारण त्यांच्या मनात भीती असते. काही वेगळ्या कल्पना असतात. नातलग आणि इतर मित्रांचे अनुभव ऐकून एक निगेटिव्ह मत झालेले असते. कदाचित लग्न होईल की नाही? पुढील भवितव्य काय? नक्कीच एखादया मुलीच्या पालकांना असे प्रश्न भेडसावत असतील त्यात काही वावगं नाही.

नोकरी दरम्यान अत्यंत कमी दरात स्विमिंग पूल आणि क्लबमध्ये मिळणारी मनोरंजनाची साधने, खडतर प्रदेशात नियुक्ती झाल्यास विशेष भत्ता, अशांसारखे अनेक फायदे आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त मिळतात.

या व्यतिरिक्त संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना केंद्रीय विद्यालयात अग्रक्रमाने प्रवेश दिला जातो. निवृत्त होण्यापूर्वी सरकारी खर्चाने व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. शिवाय दोन वर्षांची पूर्वतयारी रजा दिली जात असल्याने या रजेमध्ये अधिकारी एम.बी.ए., एम.सी.एस. यासारखे पूर्ण वेळचे अभ्यासक्रम आपल्या आवडीच्या विद्यापीठांमधून पूर्ण करू शकतात. एवढेच नव्हे तर तिन्ही दलांनी आपापले कल्याणनिधी उभारले असून त्यातून कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्त्या, परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य अश्या सुविधा आहेत.

परंतु संरक्षण दलातील सेवेची निवड करताना केवळ आर्थिक फायद्याकडेच लक्ष केंद्रित करणे योग्य नाही. सामाजिक स्थान, सन्मान, गणवेशाचा एकंदर रुबाब आणि देशाचे रक्षक म्हणवून घेण्याचा मान हा इतर कोणत्याही देशात नाही याची जाणीव तरुण युवकिनी मनाशी जपली पाहिजे आणि आवर्जून जोपासली पाहिजे. पूर्वी तिन्ही दलात १० – १५ वर्षांचा बॉंड असायचा आता इतर नोकरी सारखे निवृत्त होता येते. स्त्रियांसाठी आर्मी, नेव्ही आणि एरफोर्समधील नोकऱ्या कमी धोक्याच्या आहेत नेहमीच काही फ्रंटवर जाऊन लढावे लागत नाही. काही अश्या पोस्ट आहेत ज्या सीमेवर न जाताही सेवा करता येतात. येणारा काळ विचारात घेता आपल्याला आपली सर्व संरक्षण दल सक्षम आणि चुस्त ठेवण्यासाठी तरुणाईची आवश्यकता आहे. भारत माता की जय..!

जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

1 Comment on महिलांना संरक्षण दलात अनेक संधी !

  1. Sir I have a daughter and want to send her in indian army .but no proper guideline I m getting. Pls malaa sangu shakaal ka

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..