जेष्ठांपासून युवा वर्गापर्यंत मौखिक आरोग्य स्वच्छतेची काळजी आणि त्याच्या फायद्यांसंबंधी जागरूकता वाढवणे हाच या आंतरराष्ट्रीय दिवसाचा उद्देश आहे. हे एक दूरगामी जागतिक मौखिक आरोग्य अभियान आहे. यानिमित्ताने बालकांपासून वृद्धांपर्यंत मौखिक आरोग्याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जातात.
जगातील १३६ देशांमधील दंतवैद्यांच्या १९१ संघटना जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा करतात. जगातील सर्वच देशांमधील दंतवैद्यांची संघटना स्थापन करण्याचा निर्णय अमेरिकेतील कोपनहेगन डेंटल सोसायटीच्या बैठकीत १८९४ मध्ये घेण्यात आला.‘ फेडरेशन डेंटायर इंटरनॅशनल’ म्हणजेच एफ.डी.आय. असे या संघटनेचे नामकरण झाले. १८९९ मध्ये पॅरीस शहरात संघटनेने पहिली ‘वर्ल्ड डेंटल कॉन्फरन्स’ आयोजित करून जगातील दंतवैद्यानो एकत्र या अशीच हाक दिली. परिणमी संघटनेची व्याप्ती वर्षागणिक वाढली.
आज जगातील अनेक देशा आणि संघटना एफडीआय या शिखर संघटनेशी संलग्न आहेत. त्यामध्ये भारतातील ‘इंडियन डेंटल असोसिएशन – आयडीए’ सुद्धा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली फेडरेशन डेंटायर इंटरनॅशनल ही संघटना (FDI) या नावाने ओळखली जाते.
२० मार्च २०१३ पासून ‘जागतिक मौखिक आरोग्य दिन / वर्ल्ड ओरल हेल्थ डे’ साजरा करण्याचे या संघटनेने घोषित केले. त्या वर्षी ‘हेल्दी टीथ फॉर हेल्दी लाइफ’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे. २००७ मध्ये दुबई येथे झालेल्या परिषदेत एफडीआयचे संस्थापक डॉ. चार्ल्स गॉडन यांचा जन्मदिन १२ सप्टेंबर असल्यामुळे त्या दिवशी मौखिक आरोग्य दिन साजरा करण्याचे घोषित झाले होते; परंतु २०१३ पासून त्यामध्ये बदल करण्यात आला आणि त्या नंतर प्रत्येक वर्षी २० मार्च रोजी ‘ओरल हेल्थ डे’ चे आयोजन संघटना करत आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply