कामाच्या गर्दीत अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे एखादे काम किंवा पदार्थ पूर्ण झाल्यावर आपण हात धुतो. लगेच पुढचं काम वाट पाहात असतं अशावेळेस दोन्ही ओले हात पायाच्या दोन्ही बाजूंकडे साडीला, गाऊनला किंवा ड्रेसला पुसले जातात. कधी ते हात हळदीने पिवळसर झालेले असतात किंवा धुतलेले असले तरी त्यावर तेला-तूपाचा अंश असतो. मग त्या हाताच्या ओलसर, तेलकट, पिवळसर छप्प्यांनी वस्त्राच्या दोन्ही बाजू अगदी मेणचट होतात. धुतले तरी ती वस्त्रे स्त्रीच्या गोंधळाची साक्ष देत असतात.
आयत्यावेळेस आलेल्या पाहुण्यांसमोर असं दर्शन स्वत:लाच लाजिरवाणे वाटते. घडू नये म्हणून पाच मिनिटांचा उपाय आहे. कमरेला बांधायचा ॲप्रन वापरा. क्षणात बांधता येतो, कोणी आलं तर क्षणात काढता येतो. पुन्हा अंगावरील वस्त्र स्वच्छ.
तसे ओट्याचा काठ घासून सुद्धा पोटाजवळ अंगावरील वस्त्र खराब होतात. अॅप्रन जर सर्व डाग जिरवत असेल तर आपण अपटूडेट आणि स्मार्ट दिसायला काय हरकत आहे? अॅप्रन धुतला की स्वच्छ पुन्हा वापरायला तयार. ओले, तेलकट, हळदीचे हात त्याला पुसा. तो कधीच तक्रार करीत नाही.
– सौ निलीमा प्रधान
क्रमश:
Leave a Reply