अॅप्रन वापरणे हे अजुनही मागील पिढीतील स्त्रियांना एखादे फॅड वाटते. ‘उगाचच· कौतुक’ असा सूरही ऐकायला येतो.
त्यांच्या काळात चुलीवर किंवा जमिनीवर स्वयंपाक करताना तशी ॲप्रनची गरज नसेलही. पण आज नोकरी करणारी स्त्री सर्व आवरून बाहेर पडायच्या तयारीत असते. त्यावेळेस ओट्याजवळ काम करायची गरज वाटल्यास ॲप्रन अंगावरचे इस्त्रीचे, सुंदर कपडे नीट राखायला किती मदत करतो ते अॅप्रन वापरल्यावरच लक्षात येईल.
अॅप्रनच्या बरोबरीने स्वयंपाक करताना दोन सूती नॅपकिन्स हाताशी असावे. अगदी चिकट हात पुसायला किंवा पातेले गॅसवरून उतरवण्यासाठी असा एक आणि दुसरा स्वच्छ असलेला, ताटं, वाट्या, भांडी पुसण्यासाठी हे दोन नॅपकिन्स, दोन वेगवेगळ्या रंगाचे असावेत. म्हणजे वापरताना कुठला कोणता ते लगेच लक्षात येते. शक्य असल्यास हे नॅपकिन्स् हॅण्डलमचे सुती असावेत. अंगात वापरलेल्या जुन्या वस्त्रांची फडकी येथे वापरू नयेत.
मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर, ज्युसर, टोस्टर, फ्रीज इ. उपकरणे आणि प्यायच्या पाण्याचे पिंप, हंडा कळशी या गोष्टींच्या जागा स्वयंपाक घरातच असतात. हाताशी असाव्या म्हणून यांना किचन ओट्यावरच आपण स्थान देतो. ते योग्यच आहे. किचन ओट्यावर जरी एक्झॉस्ट फॅन असला तरी फोडणीचे, तळणीच्या तेलाचे तुषार किचनभर पसरतात. तेव्हा या सर्व वस्तूंची निगा राखणे आवश्यक आहे.
Leave a Reply