चपात्या करताना ओट्यावर कागदाचा अवश्य वापर करावा. कारण चिकट कणिक, तेल, तूप, सांडून ओटा मेणचट होतो. मग तो धुतल्याशिवाय स्वच्छ होत नाही.
ओट्या खालच्या सामानाच्या ट्रॉलींमध्ये काही दिवसांनी धूळ जमा होते, जाळी धरतात. संपूर्ण ट्रॉली एक दिवस साफ करायला काढल्यास अर्धा दिवस निघून जातो. भरपूर दमणूक होते ती वेगळीच. त्यासाठी रोज एकच ट्रॉली रिकामी करून सिकवर स्वच्छ करून लावली तर. कामाचा ताण येत नाही आणि किचन स्वच्छ राहाते.
यापुढे गॅस वाचविण्यासाठी बरीच ओढाताण करावी लागणार आहे. गॅस वाचविण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पातेले स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही शेगडीवर ठेवता त्या पातेल्याच्या तळाच्या आकाराच्या बाहेर गॅसची फ्लेम जाता उपयोगी नाही. तळाला जेव्हढी आच लागेल त्यावर पदार्थ नीट शिजतो. पातेल्याच्या तळाच्या बाहेर येणारी फ्लेम म्हणजे गॅस वाया जाणे.. आहे.
बर्नरची छिद्र नेहमी मोकळी आणि स्वच्छ हवीत. गॅसवर ठेवण्यात येणाऱ्या पदार्थाचे तपमान रूम टेंपरेचर इतके पाहिजे. फ्रीजमंधून काढून दूध किंवा अन्य पदार्थ लगेच गॅसवर ठेवल्यास दुप्पट गॅस जळतो. एकदा भाजीला उकळी आल्यावर गॅस बारीक करून मंद गॅसवर पदार्थ उकळवावा. पदार्थ पूर्ण तयार झाल्यावर लगेच गॅस बंद करावा. उगाच उकळत ठेवू नये.
Leave a Reply