हा आपल्या प्रत्येकाच्याच स्वयंपाकगृहात हमखास असतो व आपण त्याचा वापर ही बरेचदा करत असतो.पण ह्याच ओव्याची वेगळ्या अंगाने ओळख करून घेऊया.
ओव्याचे १-१.३३ मी उंच रोमश मऊ क्षुप असते.ह्याची पाने बाळंतशेपेच्या पानासारखी दिसतात.फुले संयुक्त व छत्र युक्त असतात.फळ तांबूस पिवळे असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे फळ.ओवा चवीला तिखट,कडू असून उष्ण व हल्का असतो व तीक्ष्ण व स्निग्ध असतो.ह्यात २-४ टक्के सुगंधी तेल असते.हा कफवातनाशक असून पित्तकर आहे.
चला आता ह्याचे काही औषधी उपयोग पाहूयात:
१)वेदना व सूज आली असता ओव्याचे तेल चोळले जाते.
२)पोटदुखीमध्ये पोटावर ओव्याचा लेप लावतात व ओव्याच्या पुरचुंडीने शेकतात.
३)ओवा जंतुनाशक असल्याने गरम पाण्यात ओवा घालून जखम स्वच्छ करतात.
४)दातदुखीमध्ये ओव्याचे तेलाचा बोळा दांतामध्ये धरायला सांगितला जातो.
५)ओव्याच्या फुलांचा उपयोग कृमींमध्ये होतो.
६)वारंवार लघ्वी होत असल्यास ओवा व तीळ एकत्र करून खायला देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply