ओवी सांगते अर्थ जीवनाचा
ओवी ठरविते मार्ग समृद्धीचा
ओवी क्रिया ज्ञान देण्याची
दासबोध रचिला!
ओवुनी ज्ञानाचा प्रत्येक शब्द
राहुनी घळी योजिले प्रारब्ध
देखीले डोळा राहुनी स्तब्ध
ग्रंथ रचिला!
अर्थ–
ओवी सांगते अर्थ जीवनाचा, ओवी ठरविते मार्ग समृद्धीचा, ओवी क्रिया ज्ञान देण्याची, दासबोध रचिला!
(प्रत्येक ओवी ही देहगुण असल्यासारखीच आहे, ओवींचा अर्थ ज्याने योग्य लावला तो समृध्दीकडे जातो, निबंध लिहिण्यापेक्षा कमीत कमी शब्दात सांगायचे ते ज्ञान श्री समर्थ रामदासांनी ग्रंथ दासबोध मधून सांगितले. म्हणून दासबोध हा सर्व दृष्टीने परिपक्व आहे.)
ओवुनी ज्ञानाचा प्रत्येक शब्द, राहुनी घळी योजिले प्रारब्ध, देखीले डोळा राहुनी स्तब्ध, ग्रंथ रचिला!
(आधी केले मग सांगितले, तसेच आधी पाहिले मग मांडले, अश्या तत्वावर समर्थांनी हे ज्ञान शब्दांमध्ये ओविले आहे. कोणते कार्य कोणत्या ठिकाणी करावे हेही समर्थांनी त्यांच्या जगण्यातून दाखविले. समाज घडवायचा असेल तर त्यासाठी स्वतः अनुभवावं लागतं तेव्हा ते इतरांसमोर मांडताना त्यातली तळमळ, त्यातला आपलेपणा पोचतो. दासबोध म्हणजे काय करावे अन काय करू नये, कसे असावे अन कसे असू नये तसेच काय पिकवावे अन कसे जगू नये यांचा एक प्रवाह आहे. असा ग्रंथ रचणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामींना माझा मनापासून दंडवत.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply