नवीन लेखन...

पानसुपारी

कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम होणार म्हटले की अगोदर पानसुपारी आणणे आवश्यक असते. आणि तो विधी सुरू होण्यापूर्वी पानसुपारी देवापुढे ठेवून घरातील वडील धाग्यांना नमस्कार करुनच पुजेला बसायचे असते. दोन पान म्हणजे भक्ती आणि भाव तर सुपारी म्हणजे ज्ञान. सत्यनारायण. मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची पुजा. मंगळागौर. संक्रांतीला पानसुपारी आवश्यकच असते. त्यामुळे लग्नात आणि हळदीकुंकूवाला अगोदर हळदीकुंकू लावले की लगेच दोन पाने आणि त्यावय सुपारी देवून मगच इतर. इथे मैत्री व प्रेम याचे प्रतिक म्हणून दोन पाने त्यावर आगत्याची सुपारी याचा शिक्कामोर्तब झालाच असे. म्हणूनच काही जणांकडे सुपारी फुटली की लग्न ठरले असे समजतात….
मग पानसुपारी हे हळदीकुंकूवाला आणणे आणि पूर्ण सुपारी ऐवजी सुपारीचे तुकडे. नतंर म्हैसूर सुपारीच्या पुड्या ही प्रथा सुरू झाली. असे आलेली पाने स्वच्छ धुवून घरातील वृद्ध मंडळी खात असत पानदानात ठेवून. नाहीतर जे कुणी खात असतील त्यांना देत. आता तर पानसुपारी कुणी देत नाहीत. सणासुदीला. कार्यात जेवणाची पंगत उठली की विडा दिला जायचा. आता काही हॉटेल मध्ये ही प्रध्दत आहे. आणि घरातून तांबूल देतात. तुळजापूरला देवीला पानाची प्रभावळ असते. रेणुका मातेला दररोज तांबूल असतोच. पण पुढे पैजेचा विडा. खून करण्याची दिलेली सुपारी. बैठकीत पानाला महत्त्व आले. मात्र हे क्षेत्र आपल्या संस्कृतीत बसत नाही. पान औषधी वनस्पती आहे. त्यामुळे बाळंतपणात रोज दोन वेळा जेवणानंतर विडा देतात. बाळाचे पोट गुबार झाले की एरंडेल तेल लावून किंचित गरम करून पोटावर ठेवले की कमी होते ( हे आमच्या काळी होते. आता नाही) पानाची चंची पुढे केली की झाली मैत्री. गेट टु गेदर याच पद्धतीने करतात शेतकरी कामकरी. नुसते भजे करणे अशुभ समजले जाते तेव्हा घरातील दोन तीन पाने हाताने तुकडे करून भजी केले तरी चव छान येते. काही ठिकाणीची पाने विडे प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की कुणी विडा दिला तर तो अगदोर उकलून पाहून मग खावे. आणि पानाने भिंती रंगवू नये. अजून बरेच काही आहे पानमहात्म्य…
मग या पानसुपारीला धन्यवाद

–सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..