काय पूण्य ते काय पाप ते, मनाचा हा खेळ जाहला
ज्यास तुम्ही पापी समजता, कसा काय तो तरूनी गेला….१,
कित्येक जणाचे बळी घेवूनी, वाल्या ठरला होता पापी
मनास वाटत होते आमच्या, उद्धरून न जाई कदापी….२,
मूल्यमापन कृतिचे तुमच्या, जेव्हा दुसरा करित असे,
सभोवतालच्या परिस्थितीशी, तुलना त्याची भासत असे…..३
तेच असते पाप वा पुण्य, आमच्या अंत:करणी वाटे
आतूनी आवाज सत्य येई, तोच तुमच्या मनास पटे….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply