नवीन लेखन...

पिशवीबंद दूध आणि आपले आरोग्य

Packaged Milk and Your Health

या विषयावर लिहा अशी सातत्याने विचारणा होत असल्याने मुद्दाम लिहितोय.
आपल्या घरी येणारे दूध हे बहुतांशी एखाद्या विशिष्ट ब्रँडचे पिशवीबंद दूध असते. थोडक्यात; होमोजिनाईस्ड आणि पाश्चरायस्ड असे हे दूध असते. यातील पाश्चरायझेशन म्हणजे उच्च तापमानावर दूध तापवणे; जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया मरतील आणि दूध अधिक काळ टिकेल. सध्या याकरता बहुतांशी अल्ट्रा-पाश्चरायझेशन ही पद्धत वापरली जाते. यात २८०° फॅरेन्हाइट इतक्या उच्च तापमानावर जेमतेम ५ सेकंद कालावधीसाठी दूध तापवले जाते. या तापमानावर जसे बॅक्टेरिया मरतात तसेच महत्वाची जीवनसत्वे आणि अन्य घटकदेखील नष्ट होतात. (प्रामुख्याने बी आणि सी व्हिटॅमिन्स)
मोठ्या प्रमाणावर दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी निर्माण झालेल्या भल्यामोठ्या डेयरीच्या अर्थकारणास ही गोष्ट उपयुक्त असली तरी आपल्या आरोग्यास हितावह नाही. शिवाय अशा दुधात पेनकिलर, अँटीबायोटिक्स आणि दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी दिलेली ऑक्सिटोसिनसारखी हॉर्मोन्स यांचे प्रमाण बहुतांशी मर्यादेपेक्षा जास्त आढळून येते. हे हॉर्मोन्सचे अवाजवी प्रमाण आजकाल मुली योग्य वयाच्या आधीच ‘वयात येण्याच्या’ तक्रारींना प्रामुख्याने कारणीभूत आहे असेही संशोधने सांगतात. शिवाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे; ‘गायींचे’ असे नमूद केलेले पिशवीबंद दूध आपण भाबडेपणे गायींचेच समजून पीत असलो तरी ते जर्सी वा हॉलिस्टिन सारख्या ‘गायसदृश’ प्राण्यांचे असते; ‘गायींचे’ नव्हे!!
अमेरिकेतील डॉ.कोवन राईट्स सारखे तज्ज्ञ तर स्पष्टपणे म्हणतात; “Our issue in America is that we have the wrong cows,” या wrong cows म्हणजेच जर्सी वा तत्सम प्राणी होत.
यावर उपाय काय?
देशी गायींचे दूध मिळवणे. अशक्य वाटतंय? मुळीच नाही. सहज शक्य आहे. आज ठिकठिकाणी देशी गायींच्या गोशाळा उभ्या राहत आहेत. डांगी ते गीर अशा विविध प्रजातीतील गायींचे दूध आज थोडासा शोध घेतल्यास सहज उपलब्ध आहे. डोंबिवलीसारख्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या घरी अशा गोशाळेतूनच रोज दूध येते. जिथे गोशाळा उपलब्ध नाहीत तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन तसे प्रयत्न करावेत. गावोगावी आणि शहरा शहरांत देशी गायींच्या गोशाळा निर्माण व्हाव्या. असे गोपालन करणारे बहुतांश लोक याकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहत नसल्याने गायीची उत्तम निगा राखणे, आहार-पाण्याची योग्य सोय करणे अशा चांगल्या वातावरणात गायींना पोसले जाते. याचा त्यांच्या दुधावर सुपरिणाम होत असतो. मात्र आपण जिथून दूध घेत आहात ती गोशाळा स्वतः पाहून; खात्री करूनच घ्या. देशी गायींचे दूध मिळाले नाही तर म्हशींचे दुधदेखील चालेल. मात्र पुन्हा स्रोत खात्रीचा असणे गरजेचे. अन्यथा पुन्हा हॉर्मोन्स आणि अँटीबायोटिक्सचा मुद्दा इथेही लागू होतोच.
निरोगी रहायचे असल्यास उत्तम आहार घेणे अत्यावश्यक आहे. याकरताच जे खात आहात ते उत्तम दर्जाचे आहे की नाही यावर कटाक्ष हवा. देशी गायींचे दूध आणि तूप हे आयुर्वेदानुसार सर्वोत्तम ‘टॉनिक’ आहे; त्याचा दैनंदिन आहारात वापर हवाच. दुसऱ्या बाजूला हेदेखील लक्षात घेणे महत्वाचे आहे की; उठसूट गोमूत्रासारख्या गोष्टीचा दैनंदिन वापर करू नये. अशा बाबतीत अन्य कोणाही अननुभवी आणि स्वयंघोषित तज्ज्ञांचा सल्ला न घेता शासनमान्यताप्राप्त पदवी असलेल्या आयुर्वेदीय वैद्यांचाच सल्ला घ्यावा.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..