नवीन लेखन...

पद्मावती

‘संजय (वडील कोण ते माहित नाही) भन्साली’ यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी जोरात आहे. या चित्रपटात इतिहासाचं विकृतीकरण केल्याचा लोकांचा आरोप आहे. संजय (वडील कोण ते माहित नाही) भन्साली’यांना इतिहासाची मोडतेड करण्याची जुनीच खोड आहे. इथे प्रश्न पद्मावतीच चित्रपटाचा नाही, तर असे चित्रपट काढण्याची डेअरींग भन्साली वा तत्सम नररत्न वारंवार करतात कसे, हा आहे आणि नेमकं इथंच आपलं दुर्लक्ष होतं.

माझ्या मते या किंवा इतर कोणत्याही चित्रपटावर किंवा कलाकृतीवर बंदी आणूच नये. लोकशाहीत अशी बंदी कायद्याने आणताही येत नाही. बंदी आणणे हा योग्य मार्ग नाही.

मला वाटतं, आपल्याला भन्सालींसारख्या नतद्रष्टांना धडा शिकवण्यासाठी, आपण त्यांच्या चित्रपटावर वा कलाकृतींवर अशी बंदीची मागणी न करता, असे चित्रपट आपण कोणी पाहायचेच नाहीत असं ठरवावं. लोकशाहीत कोणत्याही विषयावर चित्रपट काढायला किंवा भाष्य करायला बंदी नाही. याला अविष्कार स्वातंत्र्य असं म्हणतात. त्याच लोकशाहीत तो चित्रपट पाहायलाच हवा असंही बंधन नाही. मग आपल्या हातात हे घटनात्मक हत्यार असताना, आपण बंदीची मागणी का करतोय हे अनाकलनीय आहे. वादग्रस्त गोष्टी बनवायच्या, आपण निषेध नोंदवायचा आणि रांग लावून किंवा ऑनलाईन तिकीट काढून असं काहीतरी बघून निर्मात्यांना भरघोस फायदाही आपणच मिळवून द्यायचा, असं होत असल्यानेच असे सत्याचा विपर्यास करणारे चित्रपट आपल्याला फाट्यावर मारून वारंवार बनवायचं धाडसं असे लोक करतात. आपल्या समाजाची नाडी त्यांना नेमकी ओळखलेली असल्याने असं होतं.

मला वाटतं, असे इतिहासाचं विकृतीकरण केलेले चित्रपट आपण बघायला न जाऊन सहज आपटवू शकतो. बंदीची मागणी करण्यापेक्षा, जनतेला हा चित्रपट विकतच काय, फुकटही पाहू नका असं आवाहन करावं . हे शक्य आहे का हे बघा..!
हे शक्य झालं, तर पुन्हा असा चित्रपट काढायचं धाडस, “संजय (वडिलांचं कोण माहित नाही” भन्साली किंवा इतर कोणीही पुन्हा करणार नाही. आपण समाज म्हणून एक नसल्याने असं होतं, इथं लक्षात घ्यायची गरज आहे.

मी याचे असे पूर्वीचे चित्रपट पाहिलेले नाहीत, हा पण पाहाणार नाही, अगदी टिव्हीवर येईल तेंव्हाही. मी तुम्हालाही हेच आवाहन करतो..!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..