आज सकाळी मी पोस्ट केलेल्या ‘पद्मावती’ या लेखातील श्री. संजय लीला भन्सालींच्या वडीलांचा मी केलेला उल्लेख बहुसंख्यांना खटकला, हे चांगलं की वाईट हे नंतर ठरवू, पण माझ्या लेखातून माझ्याकडून ती चुक का ‘झाली’ हे सांगणं माझं कर्तव्य ठरतं.
चित्रपटांचा जनमानसावर प्रचंड परिणाम होतो. चित्रपट हे लोकशिक्षणाचं माध्यम आहे. म्हणून चित्रपट बनवानारांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. ते काय दाखवतायत हे मनोरंजन म्हणून प्रेक्षक घेत असले तरी तो पाहाणाऱ्या जनमानसांच्या विचारावर त्याचा नकळत प्रभाव पडत असतो हे विसरुन त्यांना चालणार नाही. शाळेत शिकवला जाणारा इतिहास आणि पडद्यावर दिसणारा इतिहास ह्या दोन गोष्टी वेगळ्या दिसल्याने मनोरंजन होते की नाही माहित नाही, पण पाहाणारांचा गोंधळ मात्र निश्चित होतो. हे त्यावेळी जाणवत नाही, पण मनावर दूरगामी परिणाम करून जातं.
आपल्या इतिहासातल्या थोर व्यक्तीही आपल्यासारखीच माणसं होती. त्यांनी चुका केल्याही असतील किंवा समाजसंकेत सोडून ते वागलेही असतील, तरी त्यांच्या कर्तुत्वार चर्चा करावी, त्यांच्या चुकांवर वर्तमानात वा भविष्यात चर्चा करु नये असा जगभरचा संकेत आहे. असे संकेत जेंव्हा पायदळी तुडवले जातात, तेंव्हा मात्र समाजवस्त्र कुठेतरी विरतेय, असं समाजायला हरकत नाही. आणि हे मला जास्त चिंताजनक वाटतं.
अविष्कार स्वातंत्र्यालाही एक स्वयंमर्यादा असावी. भन्सालींच्या वडिलांचा उल्लेख करताना माझ्या लेखात मी ती मर्यादा सोडली व तेच नेमकं तुम्हा सर्वांना खटकलं. तसंच पदमावतीबद्दलही खटकांवं अशी अपेक्षा आहे, आग्रह नाही. माझे भन्सालींच्या वडिलांबद्दल लिहिणं तुम्ही मनोरंजन म्हणून घेऊ शकत नाही, मग तोच न्याय पद्मावतीला का लावू शकत नाही? या लेखातील भन्सालींच्या वडिलांचा तसा उल्लेख करुन मला हेच दाखवून द्यायचं होतं की आपण प्रत्येकजण स्वत:ची मर्यादा विसरतोय. भन्सालीने हेच नेमकं केलंय. मी माझ्या लेखात झालेली, नव्हे मुद्दाम केलेली, माझी चुक मान्य केली आणि विषयावर पडदा पडला, येवढं हे सोप असू नये हेच मला माझ्या लेखातून दाखवून द्यायचं होतं. उद्या भन्सालीही हेच करणार आणि चुकांचा सिलसिला पुढे सुरु राहाणार..
सर्वाच्या प्रतिक्रियेची वाट पाहून उत्तर दिलंय. सर्वांना हाच मुद्दा खटकला, तो का याचं विश्लेषण मी माझ्या उत्तरात केलंय. माझ्या लेखावरील जवळपास सर्वच प्रतिक्रीया एकाच प्रकारच्चा होत्या न मला त्याचा अंदाज लेख लिहितानाच आला होता व ती चुक ‘झाली’..
आपल्या लोकांच्या विचार करायच्या पद्धतीचा थोडासा अंदाज मला आलेला आहे व नंतर या ‘झालेल्या (कि केलेल्या?)’ माझ्या चुकीतून तो आणखी थोडासा पक्का झाला.
मी चुक कबूल केली, माफी मागीतल की पुन्हा ती नव्याने करायला मोकळा झालो, हा त्या माफिचा अर्थ. भन्सालीही तेच करणार. आपली (माझ्यासकट)सर्वांची विचार करायची पद्धत किती वरवरची आहे, हे मला अधोरेखीत करायचं होतं यातून.
धन्यवाद.
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply