अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल. त्यांचा जन्म १ नोव्हेबर १९६५ रोजी झाला. गायनाची आवड असणा-या पद्मिनीने लहानपणापासून अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. लहान असतानाच आपल्या बहिणीबरोबर त्यांनी ‘यादोंकी बारात’,‘दुष्मन दोस्त’ या चित्रपटांसाठी गाणी गायली. राज कपूर यांच्या १९७७ साली आलेल्या ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ या सिनेमामध्ये त्यांनी केलेली भूमिका खूप गाजली. लहानपणी ‘साजन बिना सुहागन’, ‘जिंदगी’ आणि ‘गेहराई’ या सिनेमामध्ये त्यांनी अभिनय केला असून मोठेपणी ‘दो दिलो की दास्तान’, ‘विधाता’, ‘सौतन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘इन्साफ का तराजू’ या सिनेमांमधून भूमिका साकारल्या. २००४ साली ‘चिमणी पाखरं’ आणि ‘मंथन’ या दोन सिनेमांमधून त्यांनी रूपेरी पडद्यावर पुनरागमन केलं होतं. मराठी, हिंदी भाषेतील सिनेमांबरोबरच त्यांनी काही मल्याळम चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply