पाहताना तुला पावसाळी,
थेंबा–थेंबानी जादू पसरे,
तनी मनी प्रीत ओघळती, रोमारोमात प्रेमगंध उधळे,–!!!
बरसताना मेघ गडगडाटी, विद्युल्लता कशी उचंबळे,
जिवलगाची ओढ केव्हाची, मिटल्या ओठी यौवन उन्मळे,–!
सर येता मोठी पावसाची,
अणू रेणू ओलाचिंब करे,
भिजण्यातही रूक्षपणा भारी, जोवर नाही आपण सामोरे,–!!!
सर्द हवा कशी ओली,
मनातलेही काहूर तसे,–
अवचित तुझी मूर्त पाहिली,
हृदयी, कारंजे उडत असे,–!!!
पडतो एकमेकांच्या मोही,
दोन देह एक, संगे ,
आकर्षण आता त्यापुढेही,
लौकिकही पडले मागे,–!!!
पाऊस पडता धरणी भिजली स्वप्नपूर्ती तिची होत असे, पुरुषार्थाचा आनंद पावसासी, तृप्तीचे समाधान मिळत असे,
तुझ्या माझ्या मोहक मिलनी, काळजांचे धागे गुंफले,–
चोहीकडे पसरली हिरवाई, सृजनाला अंकुर फुटले,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply