पाहताना तुला मनात,बिंब डोळियांत हाले,
सामावत साऱ्या चरांचरांत,
हृदयात प्रेमपक्षी बोले,–!!!
जिथे तिथे तू दिसतेस,
खाणा-खुणा तुझ्याच ना,
गंधखुळा वेग मनाचा,
प्रीत पाखरू उडतेच ना,-!!!
काळजातच तुझे अस्तित्व,
जिथे पाहतो तिथे तू,
हसून बोलाविशी मला,
जशी खूण करून तू ,–!!!!
तुझ्या गाली पडे खळी,
गोड गुलाबी रंग तिचा,
पाहून तुला कोलमडती,
मी एकटाच का तसा,–!!!
कुठून आणलेस लावण्य,
जिवा करते ते घायाळ,
पदोपदी तुझीच स्वप्नं,
किती गेला यातच काळ,–!!!
*सौंदर्यवती तू देखणी,
लावण्याची असशी खाण*,
मी एक साधा भोळा,
कसे पटवू तुला सांग,–!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply