कृषि विदयालयात मित्रांच्या खुप बढाया मारल्या जायच्या मी हे केलं मी ते केलं हे तर काहीच नाही त्यापेक्षा मी जास्ता करु शकतो वगैरेवगैरे. एकाने हरभराच्या झाडावर चढवायचे दुस-याने उतरवायचे अश्या बोलण्यातच एकदा आमच्या मित्रांमध्ये पैज लागली. एक किलो पेढे खायची किंवा दोन डझन केळे खायची जो हरला त्याने मुंडन (टकली) करायचे.बोलणं खुप सोप असतं करण अवघड.म्हणतात ना बोलाचीच भात अनं कढी करु नये.दोघांनाही सहज वाटत होत शक्य आहे.सकाळचे प्रक्षेत्र काम संपवुन दुपारी जेवायच्या वेळेस सर्व जमले.कोण जिंकणार कोण हरणार सगळयांना उत्सुकता होती.पेढयांच एक किलो ठिक आहे छोटे मोठे घेतले तरी तेवढेच पण केळीच्या बाबतीत तसं नाही छोटी, मध्य्म, मोठे तीन प्रकार प्रतिस्पर्धांने दोन डझन केळी मोठी बधुन आणली.कारण त्यालाच जिंकायचे होते.आम्ही आमच्या खानावळीत जाऊन पटकन दोन चार घास खाऊन आलो.या दोन्ही मित्रांनी तर जेवणच केल नाही.कारण त्यांना स्पर्धेत तर जेवायचेच होतं.
स्पर्धा सुरु झाली आम्ही दोनहीकडुन होतो.दोघांनाही प्रोत्साहन देत होतो.दोघांनाही खोलीच्या मधोमध बसवलं पण आधी कोण सुरु करणार प्रश्न् होता.एका मित्राने तोडगा काढला.नाणेफेक करुन झापा काटा करायचा. जो हारला त्याने सुरु करायची.ठरलं
नाणेफेक केळेवाला स्पर्धक जिंकला.पेढेवाल्याला सुरु करणे भाग होते.त्याने सर्वांकडे एक नजर फिरवली नंतर पेढयांवर टाकली.आता काही खरे नाही.सर्व मित्र मंडळी उत्साहात त्यातही दोन पाटर्या पडल्या पेढेवाली आणि केळेवाली. हुप हुप हुररररररे…. जितेंगे भाई जितेंगे वगैरे आणि आम्हीच जिंकणार…
स्पर्धेला सुरुवात झाली.एक पेढा दोन पेढा करत अर्धा किलो पर्यंत काही वाटले नाही.नंतर थोडे जड जायला लागले.मध्येच पाणी घे.आता तिनपावशेर पेढे संपले होते.अजुन अंतिम लढाई बाकी होती.शेवटचे पावशेर पेढे खुप जड जात होते.तोंडातुन परत येतील की काय असा चेहरा करुन तो पेढे खात पावणखिंड लढत होता.सर्वांचे प्रोत्साहन अन आपण जिंकणारच हा आत्म्विश्वास त्या स्पर्धकांत होता.आता शेवटचा पेढा तोंडात टाकला त्याला जोराचा ठसका बसला पण तो त्याने गिळला आणि एक किलो पेढे त्याने फस्त् केले. पुन्हा मित्रांचा जल्लोष जिंकलारे भो…. हुप हुप हुररररररे…. जितेंगे भाई जितेंगे वगैरे आणि आम्हीच जिंकणार… आता केळेवाल्याची बारी होती.त्याने तशीच सुरुवात केली.एक केळी दोन केळी करत करत एक डझन संपवली.आता खरी जिंकण्याची लढाई होती.जेम तेम करत दिड डझन संपवली आता त्याच्याही आशा संपत आल्या होत्या.मित्रांचा आग्रह जिंकण्याची उमेद जागृत करत अजुन दोन संपवली.पोटात अजिबातच जागा नव्हती.पण तरीही जबरदस्तीने खात होता.चार केळे जीवघेणे ठरतात की काय असे वाटु लागले.अजुन एक कसेबसे संपवले.त्याची हदद संपली होती.काहीही झाले तरी चालेल पण खायचे नाही.आणि तो मुंडन करण्याच्या तयारीत उठला.पुन्हा मित्रांचा जल्लोष विजेत्या स्पर्धकाला डोक्यावर धरुन नाचु लागले.हारणा-या काय थोडयाश्या साठी हारला मित्रा..
पैज जिंकला स्पर्धा संपली.मुंडन झाले.अजय देवगन सारख्या वन साईड लांबसडक केस असलेला मित्र शाकाल बनुन गेला होता त्याचे ते रुप पहावत नव्हते.येता जाता मित्र त्याला टकल्या चिडवु लागले होते.आणि त्याच्या टकलावर टपली मारत होते.
स्पर्धा संपली होती.संध्याकाळी त्यांनी जेवणच केल नाही.दुस-या दिवशी सकाळीही नाही व संध्याकाळीही नाही.पोटातुन खाली काही सरकत नव्हते.हे दोघेही फक्त् डब्बा घेऊन जायचा कार्यक्रम करायचे पुढे काहीही नाही.ही गोष्ट त्यांनी एक दोघा मित्रांना सांगीतली.मग पुर्ण होस्टेल मध्ये वा-यासारखी पसरली.जो तो येता जाता त्यांना विचारु लागलं कारे झाली का तिस-या दिवशीही तेच कायरे झाली का चौथ्या दिवशी डॉक्टरांकडे जावे लागले.औषध गोळया घेतल्या तेव्हा कुठे गाडी रुळावर आली….
दोघांनिही शपथ घेतली पुन्हा केळी आणि पेढे न खायची….
— संदीप पाटोळे
Leave a Reply