मारिओ जो कार्लो दो रोझारिओ द ब्रिटो मिरांडा म्हणजेच मारिओ मिरांडा यांचा जन्म २ मे १९२६ रोजी दमन येथे झाला . त्यांचे वडील पोर्तुगीज सत्ता असलेल्या दमन गावचे प्रशासक होते. मारिओ मिरांडा यांना लहानपणापासून चित्रे काढण्यास आवडत होते. शाळेमध्ये असताना आणि त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना डायरी रेखाटण्याची सवय होती. त्यांना चित्रे काढण्याची इतकी आवड होती की ते डायरीमध्ये दरोरोज एक चित्र काढायचे , त्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यांनी त्यांच्या १९४७ पासूनचा चित्रे काढलेल्या डायऱ्या जपून ठेवल्या होत्या. ह्या डायऱ्यांचा उपयोग त्यांना करंट आणि टाइम्स मध्ये नोकरी मिळवण्याकरिता झाला.
ह्या डायरी मध्ये रेस्ट्रॉरंटस , हॉटेल्सची रेखाटने आहेत. ह्या सर्व रेखाटनामध्ये गर्दी दाखवली आहे . ही सर्व रेखाटने पेनने केलेली आहेत. मारिओ मिरांडा यांना गर्दीचे आकर्षण होते. त्यांची असंख्य चित्रे पाहिली तर त्याचे मूळ दरीमधील रेखाटने आहेत असे जाणवते. ही सर्व कॅरिकेचर्सकडे झुकणारी रेखाटने आहेत. ह्या सर रेखाटनांमधून गोव्यामधील तत्कालीन वातावरं उभे रहाते. गोव्यामधील चर्च , पाद्री , प्रार्थना , तरुणांचे एकमेकांशी वागणे , रेस्तोरंट मधील वातावरण , गाणारी मुले , वाईनचे ग्लास हातात घेतलेले स्त्री-पुरुष , आठवड्याचा बाजार , मासे विकणाऱ्या कोळणी .मारिओ मिरांडा याना आधी फक्त कोकणी आणि पोर्तुगीज भाषा येत होती. त्यांचा इंग्रजीशी संबंध आला तो बंगलोरला हायस्कुलमध्ये प्रवेश घेतल्यावर.
पुढे ते १९४३ साली महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले. केवळ एक दिवस जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् मध्ये घालवल्यावर त्यांनी ताबडतोब सेंट झेवियर्समध्ये बी . ए . आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. पदवी मिळाल्यावर अनेक दिवस त्यांना नोकरी मिळत नव्हती, तेव्हा ‘ मुंबई ‘ या विषयावरची पोस्टकार्ड स्केचेस करून त्यांनी ती विकून काही दिवस काढले. मुंबई सोडून ब्राझील किंवा पॅरिसला जाण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतानाच त्यांना ‘ करंट ‘ साप्ताहिकाने त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यानंतर ‘ टाईम्स ‘ ने त्यांना घेतले. यथावकाश मिस फोन्सेका . गोडबोले , मिस निंबूपानी , बंडलदास या पात्रांचा जन्म झाला आणि मुंबईला आणखी एक व्यगंचित्रकार मिळाला. त्यांनी आपल्या आयुष्याचा महत्वाचा काळ मुंबईमध्ये घालवला. मुंबईची विविध रेखाटने त्यांनी केली त्यामध्ये मुंबईमधील गर्दी , पाऊस , रेल्वे प्रवास , दोन इमारतीमधील क्रिकेट , रस्त्यावरील प्रचंड रहदारी, गोद्यांच्या शर्यती , समुद्रकिनारे, पाणीपुरी , मोडकळीला आलेल्या चाळी ,बॉलीवूड ,अशा अनेक विषयांवर त्यांनी रेखाटने केली.
त्याचप्रमाणे गोव्याच्या बाजारामधील कोळणी असून त्यांच्याशी हुज्जत घालणारे मासे खरेदेवीकरणरे आहेत , खिशात ‘ क्वार्टर ‘ ठेवणारे आंबटशौकीन गिऱ्हाईक आहेत. बाजारात जे वातावरण असते , ज्या व्यक्ती दिसतात त्या त्या व्यक्ती अनेक वेळा मारिओ मिरांडा यांनी अनेकवेळा वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटल्या आहेत.
मारिओ मिरांडा यांनी अनेक वेळा परदेशी प्रवाशी केलेला आहे. त्यावर रेखाटलेली असंख्य प्रदर्शने जगभर झालेली आहेत. मारिओ मिरांडा यांची व्यगंचित्रे अविस्मरणीय आहेत . मुंबईमधील उच्चभ्रू वर्ग कसा आहे हे मराठी माणसाला मारिओ मिरांडा यांच्या चित्रांवरून कळले. त्यांनी जीवनाशी वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या चित्रांमधून रेखाटली आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये विलक्षण जिवंतपणा आहे हे त्यांच्या मार्केटमधील चित्रांवरून जाणवते कारण ही चित्रे बघताना मार्केटमधील वेगवेगळे आवाजही ऐकू येतात असा भास होतो.
अनेक ठिकाणी अनेक हॉटेल्समध्ये कॅरिकेचर्स दिसतात. त्यामध्ये एक जाणवते ते म्हणजे सामान्य माणूस आणि त्याचे व्यक्तीमत्व प्रत्येक कॅरिकेचर मधून दिसते. त्यांच्या चित्रांमधून मानवी मनाच्या बारीक बारीक छटा दिसतात ज्या अत्यंत सध्या आणि आपल्या नेहमीच्या परिचयाच्या असतात. त्यांनी अनेक कॅफे बार आणि हॉटेल्समध्ये म्युरल्स काढलेली आहेत. गोव्यामध्ये पणजी ययेथे त्यांच्या चित्रांची आर्ट गॅलरी आहे. तेथे त्यांच्या चित्रांच्या प्रिंट्स, त्यांची चित्रे असलेले टी शर्ट्स , कप अशा वस्तू ठेवलेल्या आहेत.
मारिओ मिरांडा यांना भारत सरकारने १९८८ साली पदमश्री , २००२ साली पदमभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. तर २०१२ मध्ये पदमविभूषण ( मरणोत्तर ) देऊन त्यांचा सन्मान केला.
मारिओ मिरांडा यांचे ११ डिसेंबर २०११ रोजी गोव्यामधील लाहोलिम ह्या त्यांच्या गावात निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply