सदानंद कृष्णाजी बाकरे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी बडोदा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुबई मधील गिरगाव येथील चिकित्सक विद्यालयात झाले.त्यांच्या आईचे नांव रमा होते . त्यांचा जन्म अमावस्येला झाला म्ह्णून घरात त्यांच्या भवितव्याबद्दल त्यावेळी चर्चा झाली होती. अर्थात त्यांच्या पुढील आयुष्यात खूपच घडामोडी घडल्या. त्यांनी शालेय शिक्षणानंतर १९३९ मध्ये ‘ सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् ‘ मध्ये प्रवेश घेतला. तेथे कलेचे शिक्षण घेत असताना त्यांच्या अभ्यासातील उत्तम प्रगतीमुळे त्यांना बहुमानाची ‘ लॉर्ड हार्डिंग्ज ‘ शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्यांना ‘ लॉर्ड मेयो ‘ सुवर्णपदकही देण्यात आले.
सदानंद बाकरे यांनी १९४४ साली शिल्पकलेतील उसाचं श्रेणीतील पदवी संपादन केल्यानंतर त्यांना सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टसची फेलोशिप मिळाली. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षीच कलाप्रदर्शनामध्ये भाग घ्यायला सुरवात केली. त्यांना १९४८ साली ‘ स्व. रुस्तम सिओदिआ ‘ पुसरस्कार मिळाला आणि उत्कृष्ट शिल्पासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक मिळाले. १९४८ साली त्यांना ‘ बॉंबे आर्ट सोसायटी प्रेसिडेंट सर कावसजी जहांगीर . चा रोख पुरस्कार मिळाला. त्यांनी एका कलाकृतीसाठी ‘ सदसिंग ‘ आणि दुसऱ्या कलाकृतीसाठी ‘ सदानंद बकरे ‘ अशी नांवे प्रवेशिकेवर लिहिली होती. हे उघड होताच अनेकनै त्याबद्दल नापसंदी दर्शवली होती.
नवनवीन प्रयोग करणाऱ्या बाकरे यांनी त्यांच्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूपच्या ‘ त्यांच्या मित्रांनी भारतीय चित्रकलेत नवीन प्रवाह तर आणलेच परंतु अनेक जुन्या परिमाणांना छेदही दिला. सदाशिव बकरे हे ‘ प्रोग्रेसिव्ह अर्टिस्ट ग्रुपचे ‘ संस्थापक सदस्य होते. बाकरे यांच्याबरोबर ‘ प्रोग्रेसिव्ह ‘ मध्ये न्यूटन सुझा , चित्रकार रझा , क्रुष्णाजी हौळाजी आरा , एम. एफ. हुसेन , हरी अंबादास गाडे यांचा समावेश होता.
सदानंद बाकरे १८५१ मध्ये लंडनला गेले तेथे सुरवातीच्या काळात चरितार्थासाठी कोळशाच्या खाणीत कामगार , हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय , रेल्वे प्लॅटफॉर्मवर हमाल, तर कधी शवागृहातील आणि दफनभूमीतील कामगार म्ह्णूनही कामे केली. त्यानंतर काही काळ ते लंडनमधील उच्चायुक्त कार्यालयात ते काही काळ छायाचित्रकार म्हणूनही काम करत होते. त्याशिवाय ते ज्वेलरी डिझाइन , पुरातन वाद्यांची देखभाल आणि दुरुस्तीही करत असत. हे सर्व करताना त्यांच्यामधील कलाकार जिवंत होता त्याची संवेदना त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही. त्यांच्या अनेक चित्रातून , शिल्पातून ते जाणवते. ते सतत कलानिर्मिती करत राहिले , त्याचे चित्र आणि शिल्प निर्मिती यांच्यावर भर तर होताच.
अमेरिका , ब्रिटन येथे त्यांना नोकरी आणि कायम-स्वरूपी नागरिकत्व मिळत असूनदेखील ते १९७४ मध्ये भारतात परत आले. त्यांचा विवाह लंडनमधील ‘ डोरोथीया ‘ या कलाप्रेमी स्त्रीबरोबर १९५५ रोजी झाला.
भारतात ते आल्यावर कोकण भागातील मुरूड-दापोली आल्यावर मुरुड येथे अद्ययावत स्टुडिओ उभारावा , विद्यादानाचे काम करावे आणि अवैध मार्गाने परदेशात जाणाऱ्या दुर्मिळ भारतीय वस्तूंचे संग्रहालय करावे , कोकण जागतिक नकाशावर यावे हे त्यांचे स्वप्न होते . परंतु ते कधीच पुरे होऊ शकले नाही. त्यांची देशात आणि परदेशात अनेक प्रदर्शने झाली. लंडन , अमेरिका , स्वित्झरलंड ,पॅरिस , फ्रांस, व्हिएनाम , मुंबई येथे खूप प्रदर्शन झाली. २००२ मध्ये मुबंईत जहांगीर आर्ट गॅलरीमधील प्रर्दशन मी पाहिले होते तेव्हा त्यांच्या चित्रांच्या ब्रोशरवर मी स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. सदानंद बाकरे ह्याच्या चिंतनमध्ये प्रयोगशीलता तर होतीच परंतु तांत्रिक कौशल्यदेखील होते आणि त्या कौशल्याची परिपूर्णताही होती. त्यांच्या शिल्पनिर्मितीमध्ये लहानमोठ्या पोकळ्या , शिल्पनिर्मितील प्रमाणबद्धता , तंत्रे-कौशल्ये हे त्यांच्या शिल्पाचे विशेष होते.
१९५५ मध्ये लंडन येथे झालेल्या प्रदर्शनामध्ये ‘ डोरोथिया ‘ ही जर्मन मुलगी त्यांच्या प्रेमात पडली आणि ७ जुलै १९५५ रोजी ते विवाहबद्ध झाले. सदानंद बाकरे यांचे व्यक्तीमत्व दुभंगलॆले होते , कधीकधी ते आक्रमक होत . त्यांच्यावर मानसोपचार तज्ञांनी लंडनमध्ये उपचार केले पण काही उपयोग झाला नाही , म्ह्णून ते पती-पत्नी दोघेही लंडन सोडून मुरुडला आले. दोघातील वाद विकोपाला गेले आणि शेवटी १९८३ मध्ये त्यांची पत्नी डोरोथीया परत लंडनला गेली.
त्यानंतर वर्तमानपत्रात त्यांनी ‘ वधू पाहिजे ‘ म्हणून जाहिराती दिल्या.मुंबईत रहाणाऱ्या मथिल्डा फुर्टाडो यांनी त्या जाहिरातीला प्रतिसाद दिला ७ सप्टेंबर १९९० रोजी त्यांचा विवाह झाला परंतु त्यांच्यात वाद होऊ लागले आणि श्रीमती फुर्टाडो त्यांना सोडून गेल्या. सदानंद बाकरे यांच्याबद्दल खूप सांगता येईल मृत्यूपूर्वीचे आणि मृत्यूनंतरचेही .
१८ डिसेंबर २००७ रोजी रात्री सुमारे साडेदहा अकराच्या दरम्यान बाकरे यांना धाप लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले , ते काहीतरी सांगण्याच्या प्रयत्न करत होते . परंतु शब्द ओठावर आलेच नाहीं आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply