पालघर पोलिसांना संयम / चिकाटी / निष्पक्षपणाबद्दल धन्यवाद.
विरार येथे एका अल्पवयीन मुलीला एका माथेफिरु तरुणाने चाकूने भोसकून जख्मी केले.
२० जुलै २०१५ रोजी अशी बातमी वर्तमान पत्र / टीव्ही आणि इतर मिडियामध्ये आली होती.
लिंक : http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=7205769
काही संघटनांनी / लोकांनी त्या तथाकथित ‘पुरुषाला’ ताबडतोब पकडा / अटक करा / शिक्षा करा अशी मागणीही पोलिसांकडे केली.
तेंव्हा नकार न सहन करू शकणा-या, गुंड प्रवृत्तीच्या, माथेफिरु, विकृत मनोवृत्तीच्या पुरुषांपैकी कुणाचे तरी आणखी एक कृत्य असं गृहीत धरून पुरुषांबद्दल चिढ निर्माण करणारी, पुरुषांपासून असुरक्षितता वाढवणारी भावना या बातमीमुळे जन – मानसात दृढ होण्यास पूरक होणार इतक्यात पालघर पोलिसांकडून या संदर्भातील पुढील चौकशीची बातमी आली. (बातमी : २५ / २६ जुलै २०१५ ) त्यात त्या मुलीने खरं कारण लपवण्यासाठी, स्वत:च्या बचावासाठी हा बनाव करून स्वत:च स्वत:स चाकू मारून जख्मी केले. असे तपासांती निष्पन्न झाले.
लिंक : http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=7321807
पुरुष आक्रमक असतात, पुरुष माथेफिरु असतात, प्रेम प्रकरणात अपयश आल्यास नैराश्येतून हल्ला करतात, शारीरिक / मानसिक नुकसान करतात. स्त्री-पुरुष प्रकरणात बहुतेक पुरूषच दोषी असतात, कायद्याची मदत आणि सहानुभूती स्त्रीलाच मिळते, संघटनांचा / लोकांचा दबाव अशी पार्श्वभूमी असतानाही पालघरच्या संबंधित पोलिसांनी संयम दाखवत, पूर्वगृह दूषित न होता तपास केला / सत्य शोधून काढले आणि पुरुषांबद्दल द्वेष निर्माण करणा-या एका बातमीचा खरा पैलू दाखवला. त्याबद्दल पालघर पोलिसांचे शतश: आभार.
सरसकट सर्व पुरुषांबद्दल समाजात विशेषत: स्त्री वर्गात एक भीतीचा, असुरक्षिततेचा जो (गैर) समज पसरलेला आहे याचा ( गैर ) फायदा घेण्याची वृत्ती काही स्त्रियांमध्ये दिसून येते त्याचे वाण अल्पवयीन स्त्रियांपर्यंत पोहोचले असल्याचे या प्रकरणावरून सूचीत होत आहे का?
पालघर पोलिसांप्रमाणे इतर जणही कुठल्याही स्त्री-पुरुष प्रकरणांकडेही लिंगभेद / पक्षपात न करता पाहतील अशी आशा आहे.
पालघर पोलिसांचा संयम / चिकाटी /निष्पक्षपणा याचं मनापासून कौतुक.
पुन्हा एकदा पोलिसांचे आभार आणि धन्यवाद.
-आकाश
Leave a Reply