नवीन लेखन...

पाली गावचा सरसगड

ऊन-पावसाच्या खेळात व धुक्यात हरवणारा गगनचुंबी डोंगर म्हणजे रायगड जिल्ह्यातील पाली येथे असलेला ‘सरसगड’ जो आजही शिवरायाच्या स्मृती जागृत करून देतो. स्वराज्य मिळवून देण्यासाठी या सरसगडाचे मोठे योगदान असल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदचे कोकणात आगमन झाले, त्यावेळी सरसगड हा किल्ला त्याच्या ताब्यात होता. त्यांनतर शिवरायांनी सरसगडावर स्वारी करून तो काबिज केला. व त्यानंतर सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त मजुर कामाला लावून या गडाची डागडुजी केली. समुद्र सपाटीपासून हा गड सुमारे १६०० फूट उंच असुन आसपासच्या परिसराची टेहाळणी करण्यासाठीच शिवरायांनी सरसगडाची निवड केली होती. पावसाळा असो किंवा हिवाळा येथे पर्यटकांची गर्दी जमते. तसंच वनडे ट्रेकिंग करण्याच्या दृष्टीनं सरसगड एक मस्त पर्याय आहे.

पावसाळ्यात मुंबईकर व पुणेकर विकेण्डला पाली येथे अर्थात सरसगडावर वनडे पिकनिकसाठी स्वारी करतात. येथे पोहचण्यासाठी मुंबई, पुणे, रायगड येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस किंवा मुंबईहून पनवेल, खोपोली येथे रेल्वेनेही जाता येते.

‘ट्रेकर’ हे गड चढून पर्यटनाची हौस भागवितांना दिसतात. पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागच्या रस्त्याने पर्यटकांची गडावर चढायला सुरूवात होते पायर्‍यांच्या शेजारी ओढा असल्याने येथे पर्यटकांना चिंब होऊन धम्मालही करता येते व तिथुन तासाभरातच आपण गडावर पोहचतो.

सरसगडावर चढतानाच सर्वत्र पसरलेली हिरवाई पाहून गड किती विलोभनीय आहे, याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. प्रथम दर्शनी असलेल्या दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. तटबंदीच्या डाव्या बाजूला पाण्याचा मोठा हौद असून त्यात बारामाही पाणी असते. पूर्वी येथून एक भुयारी मार्ग होता. पण आता येथे काहीच अस्तित्वात नाही. गडावर असलेला ‘मोती हौद’ अथांग असून, त्याच्या उजवीकडे बालेकिल्ल्याचा पायथा लागतो. पण येथे पाहण्यासारखं काही विशेष नाही. त्याच्यासमोरच पुन्हा एक हौद असून त्या शेजारी शहापीराचे थडगे आहे.

गडावर केदारेश्र्वराचे मंदिर असुन शिवरात्रीला केदारेश्र्वराला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो. शहरातल्या रहदारीपासुन दुर किंवा धकाधकीच्या जीवनशैलीला कंटाळला असाल तर एक सरस सहलीचा पर्याय म्हणून या स्पॉटला भेट द्यायला काहीच हरकत नाही.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..